दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया (सीएमए) गुणगौरव संपन्न

Mar 30, 2023

Nashik : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या डिसेंबर २०२२ मध्ये इंटमिजीएट व फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयएमआरटी कॉलेजच्या ऑडीटोरियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज, इगतपुरीचे संचालक ॲड. संदिप गुळवे तसेच नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे हे उपस्थित होते यावेळी इन्स्टिट्यूटच्या नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी तसेच पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय पातळीवर जवळपास २०,००० विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १०९५ विद्यार्थी सीएमए फायनल परीक्षा पास झाले यात नाशिकमधील ६ विद्यार्थांनी सीएमए फायनलच्या परीक्षेत यश
संपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अध्यक्ष सीएमए भुषण पागेरे यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. सीएमए ही पदवी प्राप्त केल्यामुळे औद्योगिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि प्रचंड मेहनतीने एवढे मोठे यश संपादन केल्यानंतर या पदवीचा व्यासायिक फायदा कसा करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

सीएमए कोर्स बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
इन्स्टिट्यूटच्या नाशिक चॅप्टरच्या कार्यक्षेत्रात सीएमए बद्दल व्हिजिबिलिटी देण्यास व भविष्यात या कोर्स बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी
यासाठी मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने सहकार्य केले जाईल असे आश्वासन यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. संदिप गुळवे रमेश पिंगळे यांनी दिले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सीएमए परीक्षांची पूर्वतयारी विशेष मार्गदर्शन
परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांच्या मनात अतिशय भीतीचे वातावरण असते विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती कशी दूर करता येईल त्यांचा आत्मविश्वास कसा
वाढवता येईल यासोबतच परीक्षेचा अभ्यास योग्य पध्दतीने कसा करावा याकरिता तज्ञ व प्रख्यात सीएमए योगेश पंचाक्षरी यांचे व्याख्यानं आयोजित करण्यात आले होते.
कॉस्ट अँड मॅनेजमेंट अर्थातच सीएमए सारख्या कठीण परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवश्यक गोष्टी बद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
– परीक्षा काळामध्ये वेळेचे योग्य नियोजन करा
– लक्ष विचलित होऊ देऊ नका, गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा
– आपले लक्ष केंद्रित करून प्रचंड मेहनत करा व स्वतः वचनबद्ध राहा.
– वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून सातत्याने अभ्यास चालू ठेवा
– ढोबळ मेहनत न करता योग्य पद्धतीने अभ्यास करा अशा प्रकारचे काही मोलाचे सल्ले त्यानी विद्यार्थांना दिले.

इन्स्टिट्यूटच्या नाशिक चॅप्टरच्या विद्यार्थ्यांकरिता घेतल्या जाणाऱ्या कोचिंगचे शिक्षक व शिक्षिका पैकी उपस्थित सीएमए मैथिली मालपुरे, सीएमए रेखा सजनानी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संस्थेने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन तसेच कोचिंग साठी लाभलेल्या शिक्षकाचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिश्मा दुदानी यांनी केले तर सीएमए निखील पवार यांनी सर्व उपस्थित पालक, विद्यार्थी, सभासद व शिक्षक यांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सीएमए कैलास शिंदे, सीएमए निखील पवार, सीएमए धनंजय जाधव आदीनी कार्यक्रमाच्या यशस्वीरीत्या आयोजना करीत विशेष परिश्रम घेतले तसेच सीएमए देवेंद्र देवरे आणि सीएमए सुरज लाहोटी यांनी विशेष उपस्थिती लावली

इन्स्टिट्यूट नाशिक चॅप्टरच्या वतीने विद्यार्थाना आवाहन

डिसेंबर २०२३ च्या परीक्षेसाठी ऍडमिशन सुरू असून अधिक माहितीसाठी इन्स्टिट्यूटच्या नाशिक चॅप्टरच्या टेलिफोन क्रमांक (०२५३) २५००१५०,
२५०९९८९ तसेच व्हाट्सअप क्रमांक ९४२३७३४९०० यावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News