आय एम ए नाशिकच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा

Mar 30, 2023

अध्यक्ष पदी डॉ विशाल गुंजाळ तरी सचिव पदी डॉ.माधवी गौरे- मुठाळ पदभार स्विकारणार

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन IMA ही देशातील डॉक्टरांची सर्वात जुनी व सर्वात मोठी संघटना आहे. नाशिकमधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हास्तरीय शाखेलादेखील जवळपास 100 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे. IMA नाशिकच्या वर्ष 2023-24 साठी नियोजित अध्यक्ष डॉ विशाल गुंजाळ यांचा 31 मार्च 2023 रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोबतच डॉ माधवी गोरे – मुठाळ या सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. या नूतन कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून डॉ मनीषा जगताप, डॉ भूषण नेमाडे, खजिनदार डॉ पंकज भट, सहसचिव डॉ सागर भालेराव, डॉक्टर प्रेरणा शिंदे, सह-खजिनदार डॉ निलेश जेजुरकर, सांस्कृतिक सचिव पदी डॉ मिलिंद भराडिया, क्रीडा सचिव डॉ सागर डुकळे, वुमन डॉक्टर्स विंगच्या चेअरपर्सनपदी डॉ निकिता पाटील आणि नियोजित अध्यक्ष डॉ सुधीर संकलेचा यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आय एम ए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद कुमार अगरवाल उपस्थित राहणार आहेत. आय एम ए चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ रवींद्र कुटे, मा.आमदार डॉ राहुल आहेर, आय एम ए चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ जयेश लेले व डॉ शिवकुमार उत्तुरे, आयएमए महाराष्ट्र राज्य सचिव डॉ संतोष कदम यांच्या विशेष उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे.

येत्या वर्षभरात डॉक्टरांसाठी अभ्यासपूर्ण कार्यक्रम राबविण्यासोबतच युनायटेड वुई राईज या ह्या वर्षीच्या ध्येय वाक्याला अनुसरून डॉक्टरांच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन, आपसांत सहकार्य वाढवून, सर्वांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी नवीन कार्यकारणी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच डॉक्टरांच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील.
ह्याशिवाय सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यविषयक समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी IMA व्याख्यानमाला, ग्रामीण भागातील 1000 मुलींसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिरं आणि WHO च्या 2023 हेल्थ फॉर ऑल ह्या संकल्पनेवर आधारित विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वैद्यकीय व्यवसाय करत असताना डॉक्टरांना अनेक प्रशासकीय आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकार व प्रशासन यांच्याशी समन्वय साधणे आणि डॉक्टरांना सर्वतोपरी मदत करणे ही अत्यंत महत्त्वाची कामे हाताळण्याचा मानस असल्याचे नूतन अध्यक्ष डॉक्टर विशाल गुंजाळ यांनी सांगितले.
वर्ष 2022 – 23 या वर्षात विविध उत्तम उपक्रम राबविणाऱ्या कार्यकारिणीच्या अध्यक्षा डॉ राजश्री पाटील, सचिव डॉ विशाल पवार, खजिनदार डॉ माधवी गोरे मुठाळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, मावळत्या कार्यकारणीला निरोप देण्यासाठी व नूतन कार्यकारणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News