उझबेकिस्तानच्‍या १ वर्षाच्या चिमुकल्‍याला जीवनदान ; एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया यशस्‍वी

Apr 4, 2023

नाशिक – उझबेकिस्तानमधील नबीव्‍ह दांपत्‍याच्‍या घरी बाळ जन्‍माला आले, तेव्‍हा सर्व कुटुंबीय आनंदात होते. चिमुकल्‍या इब्रेहिमसोबत सुखासुखी जीवन जगत असतांना या १ वर्षाच्‍या बालकाला यकृताच्‍या कर्करोगाचे निदान झाले. व त्‍यांचे जीवन अंधारमयी झाले. काही दिवसांच्‍या उपचारानंतर स्‍थानिक डॉक्‍टरांनी आशा सोडली होती. पण मायदेशातील रुग्‍णाकडून नबीव्‍ह दांपत्‍याला मिळालेल्‍या माहितीनुसार त्‍यांनी नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये डॉ.राज नगरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचाराला सुरवात केली. त्‍यांचा विश्‍वास सार्थ ठरवत रुग्‍णालयातील टीमने नुकतीच ही गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया यशस्‍वी करुन चिमुरड्याला जीवनदान देत, त्‍याच्‍या कुटुंबीयांचे जीवन पुन्‍हा आनंददायी बनवले आहे.
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये आजवर सुमारे ५०० आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील रुग्‍णांवर यशस्‍वी उपचार करत कर्करोगाच्‍या विळख्यातून बाहेर काढले आहे. त्‍यातच नुकताच आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील चिमुकल्‍या रुग्‍णावर केलेले यशस्‍वी उपचार केवळ रुग्‍णालयातील टीम नव्‍हे तर सर्व भारतीयांसाठी गौरवशाली बाब आहे.
उज्‍बेगिस्‍तान येथील नबीव्‍ह दांपत्‍याला पहिले अपत्य झाले, तेव्‍हा घरात आनंदाचे वातावरण होते. मोठ्या खुशीत बाळाचे नाव इब्राहिम ठेवले. इब्रेहिम अवघ्या ८ महिन्‍यांचा असतांना यकृत (लिव्‍हर) च्‍या दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाले. ‘हिपॅटो ब्लास्‍टोमा’ या कर्करोगामुळे त्‍याच्‍या यकृतात तब्‍बल १२ सेंटिमीटर इतकी मोठी गाठ झालेली होती. उझबेकिस्तानच्या कर्करोग रुग्‍णालयात तपासण्या केल्‍यानंतर स्‍थानिक डॉक्‍टरांनी इब्राहिमला केमो थेरेपीच्‍या ८ सायकल दिल्‍या. यानंतरच्‍या तपासणीत गाठ कमी झालेली नसल्‍याचे आढळून आले. त्यामुळे स्‍थानिक डॉक्‍टरांनी आशा सोडून दिली. चिंतातुर, हताश झालेल्‍या नबीव्‍ह दांपत्‍याने हार न मानता उपचाराबाबत माहितीची शोधाशोध सुरू केली. त्‍यातच त्‍यांना मायदेशातील एका कॅन्‍सर सर्व्हायवरने नाशिकच्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरबाबत माहिती दिली. नाशिकबद्दल फारसे ऐकलेले नसल्‍याने त्‍यांच्‍या मनाची घालमेल सुरू होती. परंतु चिमुकल्‍या इब्राहिमला वाचविण्यासाठी त्‍यांनी उशीर न करता लागलीच नाशिक गाठण्याचा निर्णय घेतला. एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरशी संपर्क साधल्‍यानंतर येथील आंतरराष्ट्रीय रुग्‍णाच्‍या सहाय्यतेसाठी कार्यरत टीमने विसापासून अन्‍य आवश्‍यक तरतुदींसाठी सहाय्यता केली. जानेवारी महिन्‍यात बाळासह नबीव्‍ह दांपत्‍य दाखल झाले. पेटस्‍कॅन आणि अन्‍य तपासण्या केल्‍यानंतर प्रारंभी केमो थेरेपी देतांना मग शस्‍त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
—
यकृताचा अर्ध्याहून अधिक भाग व्‍यापला होता गाठीने
इब्रेहिमच्‍या यकृताचा अर्ध्याहून अधिक भाग गाठीने व्‍यापलेला होता. ११ किलो वजनाच्या या बाळाच्या यकृतातील गाठीचे वजन ८५० ग्रॅम झाले होते. त्यामुळे आधी दोन केमो थेरेपी सायकल दिल्‍या. व त्‍यानंतर नुकताच यशस्‍वी शस्‍त्रक्रिया एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे सीईओ तथा चीफ ऑफ ऑन्‍कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ.राज नगरकर यांनी केली. त्‍यांना डॉ.श्रृती काटे, डॉ.गायत्री रहेजा यांच्‍यासह डॉ.विकास जैन, डॉ.अविनाश, डॉ.नयना कुलकर्णी, रवींद्र तांदळे, शीतल राजपूत, शिरीष देव, डॉ.बोरसे यांची मोलाची साथ लाभली.
—
शस्‍त्रक्रिया करतांना अशी होती आव्‍हाने..
मोठी व गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया असल्‍याने उझबेकिस्तानमधील डॉक्‍टरांनी आधीच नकार दिलेला होता. त्‍यातच नबीव्‍ह दांपत्‍याने भारतातही अन्‍य काही रुग्‍णालयात चौकशी केल्‍यानंतर शस्‍त्रक्रियेची तयारी दर्शविण्यात आली. परंतु त्‍यासाठी १० ते १२ लाख रुपये खर्च सांगण्यात आला. आर्थिक परिस्थिती कमकुवत होती, त्‍यात मायदेशातील रुग्‍णाला चांगला अनुभव आलेला असल्‍याने त्‍यांनी एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथेच शस्‍त्रक्रिया करण्याचा निर्णय
घेतला. शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍यानंतर इब्राहिमच्‍या आई-वडिलांच्‍या आनंदाचा ठिकाणाच राहिला नव्‍हता.
—
मोठी व गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया
दुर्मीळ कर्करोगाचे निदान व इतकी मोठी व गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया यापूर्वी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात झालेली नव्‍हती. बालकाची शस्‍त्रक्रिया करतांना रक्‍तवाहिनी शोधण्यापासून तर शस्‍त्रक्रियेतदरम्‍यान बालकाची वैद्यकीय स्‍थिती स्‍थिर ठेवणे, रक्तस्राव टाळणे व अन्‍य आव्‍हाने होती. तीन तास चाललेल्‍या या शस्‍त्रक्रियेकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्‍याने अत्‍यंत अल्‍प रक्तस्राव झाला. बालकाचे अवघे २५ ते ३० एमएल रक्‍त निघाले. शस्‍त्रक्रियेनंतर अवघ्या चार तासांमध्ये बालकाने पाण्याचे सेवन केले. दोन दिवसांनंतर व्‍यवस्‍थित आहार घेण्यासह हसू-बोलू आणि खेळू लागला आहे.
—
सर्वोत्तम सेवा देण्याचा ध्यास बाळगत एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने आजवर हजारो रुग्‍णांच्‍या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे. त्‍यात हताश झालेल्‍या नबीव्‍ह दांपत्‍याच्‍या जीवनात नवी उमेद निर्माण करतांना इब्राहिमला नवजीवन दिल्‍याचा आम्‍हाला सार्थ अभिमान आहे. अशा यशस्‍वी कामगिरीमुळे इतरही रुग्‍णांना जगण्याची प्रेरणा मिळू शकते.
– डॉ. राज नगरकर,
सीईओ, एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News