कर्करोगाच्या अद्ययावत उपचार व सेवा एकाच छताखाली; कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका (सीसीए) चे भव्य हॉस्पिटलचे उद्घाटन

May 1, 2023

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार व मॉडेल , अभिनेत्री तसेच कर्करोगावर
विजय मिळवलेल्या लिसा रे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न, मोफत 24×7 कर्करोग हेल्पलाइन क्रमांक: 0253-6669999 ची सुरुवात. कर्करोग बरा होऊ शकतो हा संदेश देणाऱ्या स्टॅच्यू ऑफ होप चे लोकार्पण

नाशिक – कर्करोगावरील अद्ययावत उपचारासाठी नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र मधील रुग्णांना मुंबई / पुण्याला जाण्याची आता आवशकता नसून जगतविख्यात कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका (सीसीए) चे नाशिक मध्ये आगमन झाले आहे. या मुळे नाशिक मधील उत्तम आरोग्य सेवेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या अद्यावत कर्करोग हॉस्पिटल चे उद्घाटन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार व कर्करोगावर विजय मिळवलेल्या अभिनेत्री व मॉडेल लिसा रे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी बोलताना कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष डॉ राजेश सेहगल म्हणाले की, कर्करोग हा असाध्य रोग मानला गेला आहे. परंतु गेल्या काही वर्षांत निदान आणि उपचारांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित झालेल्या सुधारणांमुळे कर्करोगावर मात केलेल्यांच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. सर्वोत्कृष्ट निदान पद्धती आणि उपचार प्रक्रिया, प्रोटोकॉल आणि मानके आणि आंतरराष्ट्रीय ट्यूमर बोर्ड या मुळे हे शक्य होत आहे. आमच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क मुळे उपचार पद्धती मध्ये अनेक तज्ञाचा सल्ला देखील घेता येतो. याचा लाभ देखील रुग्णांना होत असल्याचे त्यांनी नमूद केले . नाशिकमधील या आमच्या हॉस्पिटल साठी येथील विख्यात अशोका समूहा सोबत जोडल्या गेल्याचा आम्हाला आनंद आहे.

या प्रसंगी बोलताना अशोका ग्रुप चे अध्यक्ष अशोक कटारिया म्हणाले की, हे हॉस्पिटल नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्य करेल या साठी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका या सोबत आम्ही करार केला आहे. यामुळे कर्करोगाच्या प्रगत व अद्ययावत उपचारासाठी आता मुंबई – पुण्याला अथवा कोणत्याही अन्य मोठ्या शहरात जाण्याचीआवश्यकता नाही असेही त्यांनी नमूद केले.

मॉडेल, अभिनेत्री तसेच स्वत: कर्करोगावर विजय मिळवलेल्या लिसा रे याप्रसंगी म्हणाल्या की, विविध कारणे जसे बदललेली जीवन शैली, दुषित पाणी व अन्न यामुळे संपूर्ण भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे आणि कर्करोगामुळे आपल्यापैकी किती जणांनी आपल्या प्रियजनांना किंवा प्रिय मित्रांना गमावले आहे हे पाहणे खूप वेदनादायक आहे. अधिकृत आकड्यानुसार 2022 मध्ये भारतात सुमारे २० लाख कर्करोगाचे रुग्ण आढळले . परंतु अभ्यासानुसार, असा अंदाज आहे की खरी संख्या ही यापेक्षा दीड पट ते तिन पट आहे, म्हणूनच या आजाराशी लढण्यासाठी जागरूकता आणि सकारात्मकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

याप्रसंगी बोलतांना केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार म्हणाल्या की, नाशिक मधील कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाच्या आगमनाने रुग्णांना चांगले उपचार तर मिळतीलच पण कर्करोगासाठी जनजागृती होण्यासाठी त्यांनी सुरु केलेली मोफत हेल्प लाईन हा उपक्रम निश्चीतच कौतूकास्पद आहे या हेल्प लाईन च्या माध्यमातून कर्करोगाबाबत अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होऊन रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

स्टॅच्यू ऑफ होप चे अनावरण : कर्करोगाच्या रुग्णामध्ये सकारात्मकता यावी यासाठी हॉस्पिटलच्या समोरील भागातील स्टॅच्यू ऑफ होप चे अनावरण करण्यात आले. या पुतळा दोन्ही बाजूने सारखाच दिसतो . कर्करोग बरा होऊ शकतो हीच सकारात्मक त्यातून मिळेल.

मोफत 24×7 कर्करोग हेल्पलाइन क्रमांक: उत्तर महाराष्ट्रातील कर्करोग रुग्णांसाठी मोफत असलेल्या हेल्प लाईन 0253-6669999 ची सुरुवात या प्रसंगी करण्यात आली . रुग्ण या हेल्प लाईन द्वारे आपल्या शंकांचे निरसन करू शकतात.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News