अत्यवस्थ रुग्णांस मिळाले जीवनदान ; मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटलच्या प्रयत्नाना यश

May 31, 2023

नाशिक– डॉक्टरांचा अनुभव व कौशल्य यांच्या जोडीला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर अनेकदा मृत्यूवरही मात देता येऊ शकते.असेच काहीसे नाशिकच्या 32 वर्षीय महिला प्रियंका लोखंडे यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.अत्यवस्थ अवस्थेत मुंबई नाक्याजवळील मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या प्रियंका लोखंडे यांच्यासाठी येथील क्रिटिकल केअर तज्ञ डॉ.सुमित मांदळे हे जणू देवदूतच बनून आले.
याबाबत अधिक माहिती अशी की मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे रुग्णाला दवाखान्यात दाखल केले गेले.दाखल करते वेळेस त्या रुग्णाची किडनी काम करत नव्हती .तसेच रक्तदाब खूप कमी होता.सोबतच रुग्णाला न्युमोनिया होता.तसेच हृदय फक्त 15% काम करत होते.भरीस भर म्हणून प्लेटलेट काउंट 15000 एवढाच असून खोकल्यामध्ये देखील रक्त येत होते. अशा गंभीर परिस्थितीत डॉ.सुमित मांदळे यांनी रुग्णावर उपचार सुरु केले व 15 दिवसाच्या अथक परिश्रम व उपचारांनंतर रुग्ण बरा झाला. मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटल अवघ्या एका वर्षांपूर्वी पूर्णपणे नुतनीकरण होऊन रुग्णसेवेत रुजू झाले आहे.तेव्हापासून असंख्य अत्यवस्थ रुग्णांना येथील उपचाराने जीवनदान मिळाले असल्याचे डॉ. सुमित मांदळे यांनी नमूद केले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News