“प्रतिभा सन्मान – दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड “ची घोषणा

Jun 16, 2023

संदीप युनिव्हर्सिटी व जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा उपक्रम!

नाशिक: संदीप युनिव्हर्सिटी व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए यांच्या संयुक्त विद्यमाने, यंदाचे “प्रतिभा सन्मान – दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड ” घोषित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी संदिप युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

येत्या रविवार दिनांक १८ जुनला सकाळी ९ वाजता, संदीप युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात, शहर व जिल्ह्यातील प्रत्येक क्लासमध्ये १० वी व १२ वीमध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या दीड हजार विद्यार्थ्यांचा पारितोषिक व गुणगौरवही होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉ संदीप झा उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संदिप युनिव्हर्सिटी व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी संदीप युनिव्हर्सिटीचे प्रा. प्रमोद करोले, असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, गणेश कोतकर, रविंद्र पाटील, सीए लोकेश पारख, अशोक देशपांडे, अरुण कुशारे, प्रमोद गुप्ता, मयुर जाधव, विलास निकुंभ, उमादेवी विश्वकर्मा, प्रतिभा देवरे, विद्या राकडे, किशोर सपकाळे, प्रदिप येवला, अण्णासाहेब नरुटे, दिनेश राठोड, विक्रम गोसावी, वाल्मीक सानप, निलेश दूसे आदी पदाधिकारी व संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य उपस्थित होते.

प्रतिभा सन्मान : दी बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड विजेते शिक्षक

१) श्री सचिन शिंदे सर, श्री क्लासेस, जेलरोड, नाशिक.

२) श्री जयवंत जाधव सर, जाधव क्लासेस, पवननगर, नाशिक

३) श्री सागर साळुंके सर, साळुंके कोचिंग क्लासेस, गंगापूर रोड, नाशिक.

४) श्री दुर्गेश तिवारी सर, व्हिक्टर क्लासेस, पंचवटी, नाशिक

५) श्री पवन जोशी सर, यश क्लासेस,मालेगाव स्टँड, नाशिक.

६) सीए समीर तोतले सर, तोतलेज् कॉमर्स अकॅडमी,पंडित कॉलनी, नाशिक

७) श्री महेश थोरात सर,निरंकारी क्लासेस,गंगापूर गांव, नाशिक

८) सौ सुषमा राज बंदरे मॅडम, बंदरे ट्युटोरियल्स, इंदिरानगर, नाशिक

९) श्री प्रविण गडाख सर, मातोश्री क्लासेस अँड टेक्निकल हब,सिन्नर

१०) सौ सुनिता बावणे मॅडम, साई कोचिंग क्लासेस ,पाथर्डी फाटा,

११) सौ मनिषा अशोक देशपांडे मॅडम, अमृतकुंभ क्लासेस, सातपूर, नाशिक

 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News