आशा हार्ट क्‍लिनिकतर्फे ‘हृदयरोग व योगासनेः समज-गैरसमज ‘ १८ जूनला परिसंवाद

Jun 16, 2023

नाशिक – जागतिक योग दिवसाच्‍या निमित्ताने आशा हार्ट क्‍लिनिक यांच्‍यावतीने ‘हृदयरोग व योगासनेः समज-गैरसमज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. येत्‍या १८ जूनला सकाळी ७ वाजून ३० मिनिटांपासून गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे हा परिसंवाद कार्यक्रम होणार असल्‍याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अतुल पाटील आणि स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ डॉ.पुनम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देतांना डॉ.अतुल पाटील म्‍हणाले, या कार्यक्रमाला मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांची उपस्‍थिती असेल. तसेच योग मार्गदर्शक मनोज मंडोरे यांचे हृदयरोग व योगाभ्यास या विषयावर व्‍याख्यान होणार आहे.

या कार्यक्रमासाठी मेडिनोव्‍हा शताब्‍दी हॉस्‍पिटल, श्री सिद्धीविनायक हॉस्‍पिटल आणि निम्‍स हॉस्‍पिटल यांचे सहकार्य मिळते आहे.
www.bestcardiologistnashik.in या संकेतस्‍थळावर अधिक माहिती उपलब्‍ध होऊ शकणार आहे.पुढे डॉ.पाटील म्‍हणाले, सध्याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढते आहेत. जीवनशैलीमध्ये होणारे बदल हृदयविकाराच्‍या कारणांपैकी प्रमुख व महत्त्वाचे कारण आहे. अभ्यास, नोकरी-व्‍यवसायातील तणाव यासह अन्‍य विविध कारणांनी हृदयरोगाचा धोका वाढतो आहे. त्‍यामुळे नियमित योगाभ्यास करुन हृदयविकाराला दूर ठेवता येऊ शकते. तसेच ज्‍यांना हृदयरोगाचा त्रास आहे, व औषधोपचार सुरु आहे, त्‍यांनी योगासने करावीत का? dकुठली योगासने करणे त्‍यांच्‍यासाठी अयोग्‍य आहे? की हृदयरोगाचा त्रास असलेल्‍यांनी योगासनेच करु नये? असे अनेक समज-गैरसमज समाजात आजही आहेत. जागतिक योग दिनाचे औचित्‍य साधत सर्वसामान्‍यांमध्ये जनजागृती करण्याच्‍या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाला उपस्‍थित असलेल्‍यांना डिजीटल हेल्‍थ डायरी याबद्दलचे फायदे देखील सांगितले जाणार आहेत. इतकेच नाही तर उपस्‍थितांपैकी १० भाग्‍यवंतांना लकी ड्रॉच्‍या माध्यमातून आकर्षक भेटवस्‍तू दिली जाणार असल्‍याचेही डॉ.अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News