जगातील सर्वात लहान हार्ट पंप ‘इम्पेला’च्या साहाय्याने मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जटील अँजिओप्लास्टी यशस्वी

Jul 27, 2023

नाशिक: उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य हृदयरोग उपचार रुग्णालय मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटने जगातील सर्वात लहान हृदय पंप ‘इम्पेला’चा वापर करून अत्यंत अवघड अँजिओप्लास्टी यशस्वी केली आहे.  नाशिकच्या रहिवासी 72 वर्षीय पार्वती अग्रवाल या ह्रदयविकाराने ग्रस्त होत्या. मात्र उपचारात जोखीम असल्याने यापूर्वी अनेक डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता.
ह्रदयविकाराने ग्रस्त पार्वती अग्रवाल यांची प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या आपत्कालीन कक्षात भरती करण्यात आले. तिथे त्यांना तीव्र कोरोनरी सिंड्रोम (हृदयरोग) असल्याचे निदान झाले. शिवाय, अँजिओग्रामने हृदयाच्या सर्व प्रमुख धमन्यांमधील अडथळे दिसून आल्याने आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ञ तथा मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. मनोज चोपडा यांनी इम्पेला हृदय पंपाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. मॅग्नम हॉस्पिटलमधील तज्ञांच्या टीमने पार्वती अग्रवाल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सद्यस्थितीत श्रीमती अग्रवाल यांची प्रकृती ठणठणीत आहे.

या संदर्भात डॉ. मनोज चोपडा यांनी माहिती दिली की, कमजोर हृदय, धमनीतील अडथळे, वृद्धत्व, मधुमेह किंवा किडनी समस्या, हृदयनिकामी होण्याची मध्यम ते गंभीर लक्षणे असल्यास शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. अशा शस्त्रक्रियेत मोठी जोखीम असते. “प्रक्रियेपूर्वी इम्पेला पंप टाकून, आम्ही त्यांच्या कमकुवत हृदयाच्या पंपिंग कार्याला आधार देऊ शकलो आणि हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूसह सर्व प्रमुख अवयवांमध्ये सतत रक्त प्रवाह सुरु राहिला. “शस्त्रक्रियेदरम्यान इम्पेला हार्ट पंपचा वापर अपरिहार्य बनला होता. कारण “VA अनकपलिंग” ची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे पार्वती अग्रवाल यांच्या हृदयाने क्वचितच रक्त पंप केले आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण अवयवांना बहुतेक रक्तपुरवठा हा इम्पेलाद्वारे झाला. डॉ. चोपडा म्हणतात, “इम्पेला हार्ट पंप नसता, तर माझ्या रुग्णावर अशाप्रकारे उच्च-जोखीमची शस्त्रक्रिया करता आली नसती. म्हणून त्यांचे हृदय कमकुवत असूनही त्यांचेवर जीवनदायी उपचार करणे शक्य झाले.

“मॅग्नम हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. खुशमन वैद्य सांगतात की, अलिकडच्या काळात रुग्णांमध्ये मोठी गुंतागुंत वाढली आहे. अनेक रुग्णांमध्ये ओपन-हार्ट शस्त्रक्रियेत मोठा धोका असल्याचे मानले जाते. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये हृदय पंपाच्या सपोर्ट शिवाय अँजिओप्लास्टी करणे आव्हानात्मक असते, ”

इम्पेला हार्ट पंपचे निर्माते ABIOMED चे एशिया-पॅसिफिक विभागाचे वैद्यकीय व्यवहार आणि उपचार विकास प्रमुख डॉ. कमलेश कोठावदे यांच्या माहितीनुसार, उपकरणाची सुरक्षितता आणि परिणामकारकता खूपच मजबूत आहे. “इम्पेला हार्ट पंप यूएस-एफडीएने मंजूर केला आहे आणि जगभरातील 170,000 हून अधिक रुग्णांना मदत केली आहे. हा पंप ओपन-हार्ट शस्त्रक्रियेची गरज न पडता तो मांडीच्या लहान पंक्चरद्वारे घातला जाऊ शकतो. शिवाय, इम्पेला वापरण्याचे फायदे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही वाढतात”

पार्वती अग्रवाल यांचे प्राण वाचल्याने त्यांच्यासह आणि अग्रवाल कुटुंबीयांनी मॅग्नम हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. अग्रवाल परिवाराने सांगितले की, त्यांना आता खूप बरे वाटत आहे आणि वैद्यकीय पथकाने दिलेल्या सेवेबद्दल ते सदैव कृतज्ञ आहे.
मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट बद्दल: मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट हे एक प्रसिद्ध कार्डियाक हॉस्पिटल आहे. अत्याधुनिक सुविधांसह तेथील कुशल डॉक्टरांची टीम उच्च दर्जाची हृदयरोग सेवा प्रदान करण्यास कटिबद्ध आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News