अभियंता दिनानिमित्त दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिर्स (इंडिया) तर्फे प्राचार्यांचा सत्कार

Sep 15, 2023

नाशिक – ५६ वा अभियंता दिवस भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस “अभियंता दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या १६३व्या जन्मदिनानिमित्त यंदा ५६ वा अभियंता दिवस दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर येथे साजरा करण्यात आला .

याचाच एक भाग म्हणून नाशिक लोकल सेन्टर तर्फे १५ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा होणार अभियंता दिन शुक्रवार दुपारी ३. ०० वाजता दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर येथे नाशिक मधील प्राचार्यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद नाशिक च्या CEO आशिमा मित्तल आणि अशोका बिल्डकॉन चे डायरेक्टर इंजि. संजय लोंढे यांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. आधी भारतरत्न इंजि. डॉ एम विशेश्वरय्या यांना अभिवादन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नाशिक सेन्टर ची चित्रफीत दाखवण्यात आली. इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या नाशिक शाखेचे अध्यक्ष इंजि. महावीर चोपडा यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना शाखेच्या गतिविधी विषयी सांगितले तसेच इंजि. धीरज पिचा   यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यावेळी खालील प्राचार्यांना  गौरविण्यात आले – 
इंजि. एम.व्ही. भालेराव, प्राचार्य, पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक
इंजि. व्ही.पी.वाणी, प्राचार्य, एमईटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक
डॉ. जी. एम. माळवटकर, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव.
डॉ. के. एन. नांदूरकर, प्राचार्य के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजी. एज्यु. अँड रिसर्च, नाशिक.
डॉ. व्ही. एच. पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव.
डॉ. जी. के. पटनायक, प्राचार्य, एसएसबीटी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव.
डॉ. एच. डी. पाटील, प्राचार्य, एसएसव्हीपीएस बी एस देवरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग धुळे.
डॉ. एस. बी. बागल, प्राचार्य, कै. जी. एन. सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक.
डॉ. एस. आर. देवणे, प्राचार्य, NDMVPS कर्मवीर अड. बी.जी. ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक.
डॉ. आर. जी. टेटेड, प्राचार्य, SNJB कै.सौ. के.बी. जैन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, चांदवड.
डॉ. पी. सी. कुलकर्णी, प्राचार्य, आर.एच. सपट कॉलेज ऑफ इंजी. व्यवस्थापन अभ्यास आणि संशोधन, नाशिक.
डॉ.जी.के. खराटे, प्राचार्य, मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च सेंटर, नाशिक.
डॉ. एच. एन. कुडाळ, प्राचार्य, ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक.
डॉ. एन. जी. निकम, प्राचार्य, गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च सेंटर, नाशिक.
इंजि. पी. जी. विसपुते, प्राचार्य, शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च, सिनर.
डॉ. के. व्ही. चंद्रात्रे, प्राचार्य, लोकनेते गोपीनाथजी मुंडे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर एज्यु. अँड रिसर्च, नाशिक.
डॉ. ए.डी. लोखंडे, प्राचार्य, संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक.
डॉ.जे.बी. पाटील, प्राचार्य आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे.
डॉ. एम. एम. पाटील,प्राचार्य, संदिप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर, नाशिक.
डॉ. डी. पी. पाटील, प्राचार्य, संदिप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, नाशिक.
डॉ. एम. व्ही. भटकर, प्राचार्य, जेआयटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, नाशिक.
डॉ. प्रीती अग्रवाल, संचालक, जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जळगाव.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल म्हणालया कि, इंजिनिअरिंगच्या प्राचार्यांचा गौरव करताना आनंद होत असून ते समाजासाठी खूप कष्ट घेतात, राष्ट्राची प्रतिमा निर्माण करण्यासाठी इंजिनियर्सचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते पूल बनवतात, रस्ते बनवतात एवढेच नव्हे तर त्यांची कामात कधीच चूक होत नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्या म्हणाल्या की, मानव जातीच्या प्रगतीत इंजिनिअरचे अतिशय महत्त्व आहे. इंजिनीयर हे प्रत्येक गोष्ट आत्मसात करीत लॉजिकचा वापर करतात. मात्र अभ्यासक्रमापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर भर देण्यात यावा असा सल्ला त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांना दिला. मी आयएएस असली तरी मी इंजिनीयर असून याचा मला अभिमान आहे. असे सांगत त्यांनी दि इन्स्टिट्यूशन इंजिनियअर्स ( इंडिया ) नाशिक लोकल सेंटरच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी पाहुणे म्हणून अशोका बिल्डकॉनचे डायरेक्टर इंजि. संजय लोंढे यांनी इंजिनीयर हे समाजाचे निर्माते आहेत. सर विश्वेश्वरय्या यांचे योगदान विसरता येणार नाही, धरण, मोठमोठे जल प्रकल्प ही त्यांचीच आपल्याला देणगी आहे. इंजिनिअरची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. तर प्राचार्यांनी इंजिनिअरिंगच्या प्राचार्यांनी सस्टनेबल स्ट्रक्चरला प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान निर्माण करताना यामध्ये खूप वेळ जातो. इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांनी आपला दृष्टिकोन सतत बदलता ठेवावा, नवनवीन तंत्रज्ञान दिवसेंदिवस येत असल्याने त्याची अंमलबजावणी करावी, नाविन्यपूर्ण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच शिक्षणातही त्याचा अंतर्भात असावा असेही आवाहन त्यांनी केले.

इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या रॉयल चार्टर्ड याविषयी माहिती दिली तसेच प्रतिष्ठित अभियंत्यांचा सत्काराबद्दल नाशिक सेन्टरचे कौतुक केले आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सचे  इंजि. धीरज पिचा  यांनी आभार मानले. कार्यक्रमाला इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सचे  माजी अध्यक्ष इंजि. सुमित खिंवसरा कौन्सिल मेंबर इंजि. मनीष कोठारी, इंजि. संतोष मुथा, सह सचिव  इंजि.  गौरव धारकर, माजी मानद सचिव इंजि.  समीर कोठारी , इंजि. विलास पाटिल, इंजि. धीरज पिचा,  इंजि. मंगेश गांधी , इंजि. संजय देशपांडे,  इंजि.  धनंजय ओढेकर , इंजि.  धीरज पिचा, इंजि. संतोष संचेती  आदी सदस्य व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News