सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दुसरी कॅथलॅब लवकरच कार्यान्वित

Sep 15, 2023

दहा वर्षात 30000 हृदय प्रक्रिया  आणि शस्त्रक्रिया

नाशिक – अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे रुग्णालय ठरलेल्या सह्याद्रि  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ने हृदयरोग उपचारांमध्ये अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून गेल्या दहा वर्षात हृदयाच्या  सुमारे 30000 हून अधिक प्रक्रिया [ Procedure ] आणि  शस्त्रक्रिया करणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये  दुसरी कॅथलॅब लवकरच कार्यान्वित होत असल्याची माहिती सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ सहाय्यक उपाध्यक्ष संजय चावला यांनी दिली. 2 कॅथलॅब  असणारे सह्याद्रि हे उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.

ते म्हणाले की, गेली अनेक वर्षापासून हॉस्पिटल तर्फे प्रभावी उपचारांसोबतच विविध रोग प्रतिबंधक जनजागृतीपर कार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येते. उत्तम तज्ञांची टीम, आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता व आपुलकीची वागणूक यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात सह्याद्रि हॉस्पिटल यशस्वी ठरले आहे.

सह्याद्रि हॉस्पिटल मधील हृदयरोग संबंधित तज्ञांच्या टीम मध्ये सर्जन म्हणून डॉ . राहुल कैचे व कार्डिओलॉजिस्ट म्हणून डॉ. आशुतोष साहू, डॉ. हिरालाल पवार व डॉ. प्रशांत पवार पूर्णवेळ सेवा देतात. सोबतच डॉ. श्रीपाल शहा, इंटरव्हेन्शनल न्यूरोलाॅजिस्ट हे मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजारांचे उपचार देखील  कॅथलॅब  मध्ये करतात.

विजिटिंग तज्ञांमध्ये डॉ. अतुल पाटील, डॉ. महेश आहेर, डॉ सुरेश सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. शितल हिरण, डॉ. चिन्मय कुलकर्णी, डॉ. सीमा नक्षणे , डॉ. आनंद पारख, डॉ. गौरव वर्मा, डॉ. गौरव ठाकरे, डॉ. कौस्तुभ महामने, डॉ. सचिन पाटील व डॉ. गिरीश काळे, डॉ.अमित चौधरी  हे प्रमुख आहेत.

हृदयविकाराचा झटका येऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात प्रक्रिया सुरू होणारी ‘डोअर टू निडल’ व डोअर टू बलून या प्रणालींचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले असल्याचे संजय चावला यांनी नमूद केले.

कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशुतोष साहू म्हणाले की, सह्याद्री हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक अश्या IVUS मशीन उपलब्ध असून हे हृदय रोग निदान करण्यासाठी IVUS मशीन अचूक मार्गदर्शक, सुरक्षित आणि खात्रीशीर माहिती देणारे नवीनतम तंत्रज्ञान आहे. या अद्ययावत मशीन मुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भाग दृश्यमान करण्यास सोपे असून अँजिओग्राफीच्या तुलनेत IVUS अधिक अचूक माहिती देऊन हृदयरोग आणि इतर रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजाराचे अचूक निदानासाठी उपयुक्त आहे .

दुसरी कॅथलॅब कार्यान्वित झाल्यानंतर अधिक प्रभावी पणे अजून असंख्य रुग्णावर उपचार करण्याचे शक्य असल्याचे मत कार्डिओलॉजिस्ट डॉ. हिरालाल पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे नाशिक सहित धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, ठाणे, नवी मुंबई येथील सह्याद्रि हॉस्पिटल ची निवड करत असलेल्या रुग्णांना याचा लाभ होईल आहेत.

या सोबतच शस्त्रक्रिया होण्यापूर्वी व झाल्यानंतर रुग्ण व त्यांचे परिवार यांच्याशी योग्य संवाद साधून त्यांना धीर देण्याचे काम देखील येथे केले जाते यामुळे रुग्ण व त्यांचे परिवाराच्या मानसिकतेत सकारात्मक परिणाम होतो. या सेवा साठी सर्व शासकीय योजना चा लाभ मिळत असून नोट प्रेस, सेक्युरिटी प्रेस चे तसेच संलग्न शासकीय व निमशासकीय कर्मचारी देखील येथे उपचार घेऊ शकत असल्याचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले .

गतवर्षी सेवांचा विस्तार केल्यानंतर सद्यस्थितीत सह्याद्रि हॉस्पिटल येथे 204 बेडसची क्षमता, 4के लॅप्रोस्कोपिक सर्जिकल सिस्टिम, कमीत कमी छेद असणारी हृदय शस्त्रक्रिया सुविधा, 5 -फंक्शन मोटराईज्ड बेड, सर्व विमा कंपन्यांशी सहयोग करून कॅशलेस सुविधा, उत्कृष्टता केंद्र, कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर आणि पल्मोनोलॉजी, इंटर्नल मेडिसिन, न्यूरोलॉजी आणि न्युरोसर्जरी, नेफ्रोलॉजी आणि डायलिसिस, हेपॅटोबिलियरी विभाग, जनरल सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट, ट्रॉमा आणि ऑर्थोपेडिक सर्जरी, अवयव प्रत्यारोपण आणि इतर सुविधा या काही प्रमुख आहेत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News