क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा सत्कार

Sep 15, 2023

नाशिक – येथील बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणात लक्ष घालून अवघ्या दहा दिवसातच आरोपींना मुद्देमाला सहित पकडून गुन्हेगारांना जेरबंद करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

 क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे अध्यक्ष कृणाल पाटील, राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना समितीचे अध्यक्ष जितूभाई ठक्कर, माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील,शशी जाधव, दीपक बागड,जयंत भातांब्रेकर, नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, मनोज खिंवसरा, हंसराज देशमुख,ऋषिकेश कोते, अंजन भालोदिया, सतीश मोरे, सागर शहा हे याप्रसंगी उपस्थित होते
 यावेळेस बोलताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये सर्व सहकाऱ्यांची मोलाची भूमिका होती. नाशिक शहरात सुव्यवस्था नांदावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील असून यामध्ये सर्व नागरिकांची भूमिका देखील मोलाची आहे. व्यवसायिकांनी सुरक्षित राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची आहे अशा प्रकारचे चर्चासत्र क्रेडाई नाशिक मेट्रोच्या सहकार्याने नाशिकच्या सर्व व्यावसायिक संस्थांसाठी लवकरच आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
 आपला ऋणनिर्देश व्यक्त करताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की, नाशिककरांना सुरक्षित वाटावे असा विश्वास या कारवाईमुळे मिळाला आहे. सुरक्षित शहरासही नेहमीच सर्व स्तरातून पसंती मिळते. पोलीस प्रशासनास क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल असेही  त्यांनी सांगितले ..

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News