‘महाआयएसजीकॉन २०२३’ नाशिकमध्ये शनिवारपासून आयोजन

Oct 4, 2023

दोन दिवसीय परीषदेत ३०० पोटाचे विकार तज्ज्ञ होणार सहभागी

नाशिक – इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रॉलॉजी आणि नाशिक गॅस्ट्रॉलॉजी सोसायटी यांच्या वतीने ’महाआयएसजीकॉन’ २०२३ चे आयोजन केले आहे. हे दोन दिवसीय ‘जीआय समिट’ येत्या शनिवार (दि.७ ऑक्टोबर) आणि रविवारी (दि.८ ऑक्टोबर) पाथर्डी फाटा येथील हॉटेल रॅडिसन्स ब्ल्यू येथे पार पडणार आहे. परीषदेत पोटाच्या विकारांसंदर्भातील आजार व त्यावरील उपचार पद्धतीतील आधुनिक तंत्रज्ञान, इतर विविध विषयांवर मंथन घडविले जाईल, अशी माहिती परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन बोरसे, आयोजन समिती सचिव डॉ.हुसेन बोहरी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

परीषदेत सहभागासाठी डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पत्रकार परीषदेस खजिनदार डॉ.संदीप पाटील, सहखजिनदार डॉ.शरद देशमुख यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

अधिक माहिती देतांना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन बोरसे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे उपचारात आधुनिकता आली असून, यामुळे रुग्णांना दिलासा मिळतो आहे. नाशिकमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या असल्याने गुंतागुंतीच्या आजारांवर येथे यशस्वी उपचार केले जात आहेत. पोटाच्या विकारांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना एकत्रित आणत वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देतांना मथंन घडविण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये ही परीषद आयोजित केली आहे. परीषदेत पोटाशी निगडीत उद्भवणारे नवनवीन विकार आणि वेगवेगळ्या आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती, संशोधन, शोधप्रबंधांचे सादरीकरण केले जातील.

आयोजन समितीचे सचिव डॉ.हुसैन बोहरी म्हणाले, परीषदेच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवरील २७ सत्र आयोजित केले आहेत. यामध्ये काही समुह चर्चा (पॅनल डिस्कशन), सादरीकरण आणि परिसंवादांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. परीषदेच्या दुसर्‍या दिवशी १८ विषयांवर त्या-त्या विषयातील तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

परीषदेच्या आयोजनासाठी आयोजन समितीचे सदस्य डॉ.अद्वय आहेर, डॉ.सोहम दोशी, डॉ.प्रतिभा पगार, डॉ.तुषार संकलेचा, डॉ.मंगेश मानगुळकर, डॉ.धवल चोकसी, डॉ.महेश पाटील, डॉ.गौरव बच्छाव, डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.सचिन धांडे हे परीश्रम घेत आहेत.

हया विषयांवर होणार परिषदेमध्ये चर्चा
जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणारे पोटांचे विकार व त्यांच्यावरील उपचार, औषधोपचाराचे महत्त्व, शल्यचिकित्सकांची भूमिका तसेच उपचार प्रक्रियेत एंडोस्कोपिस्टच्या निदानाचे महत्त्व, रुग्णांमध्ये आजाराप्रमाणे आहारात करावयाचे बदल, शस्त्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान यांसह यकृताशी निगडीत व्याधी, यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) नंतर संभाव्य गुंतागुंतींवरील उपचार अशा व्यापक स्वरुपातील विषयांवर परीषदेत मंथन घडविले जाणार आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News