साठीनंतर ज्येष्ठांनी वेदनाशामक औषधे टाळावे : डॉ. विशाल गुंजाळ

Oct 4, 2023

श्री सप्तश्रृंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान संपन्न

नाशिक : वयाच्या साठीनंतर शरीरातील स्नायू आणि अवयवांची झीज होते. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या येणे, संधीवात व तत्सम आजार उद्भवतात. त्यावर जास्त प्रमाणात पेनकिलर घेऊ नये. त्यामुळे आपल्या किडनीवर वाईट परिणाम होतो किंवा लगेच ऑपरेशन हा उपाय नसून ज्येष्ठांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा हलके व्यायाम करावेत असा सल्ला नाशिक पेन क्लिनीकचे मणकेविकार तज्ञ डॉ. विशाल गुंजाळ यांनी दिला.

सातपूर येथील श्री सप्तश्रृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी डॉ. गुंजाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे, शांताराम जमदाडे, प्रकाश महाजन, लोकज्योतीचे जितेंद्र येवले, प्रकाश घ्यार, शांताराम पाटील, हिराबाई सोनवणे उपस्थित होते.

यावेळी महिलांनी व सदस्यांनी विविध आजार व समस्यांचे निराकरण याविषयी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत डॉ. गुंजाळ यांनी व्यायामाचे हलके प्रकार सांगितले.मणकेविकार टाळायचे असल्यास आता ऑपरेशनची गरज नाही. प्रगत तंत्रज्ञान व संशोधनामुळे इंजेक्शन व औषधोपचारामुळेही मणकेविकाराचा त्रास टाळता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे कुठलेही दुखणे अंगावर काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी रंगनाथ आंधळे, पंढरीनाथ गायखे, चंद्रकांत निर्वाण, भगवान ठाकूर, संध्या देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश महाजन यांनी केले तर आभार शांताराम जमदाडे यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News