अँम्रो इन्स्टिट्युटचे संस्थापक राजन सोनी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध कार्यक्रम संपन्न

Oct 4, 2023

नाशिक : अँम्रो इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष स्व .राजन सोनी यांच्या जयंतीचे औचीत्त्य साधून रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. शेफ जनजागृतीसाठी भारत भ्रमंती करणारा शेफ अॅलन डीमेलो नाशकात आल्याने त्याचेही जंगी स्वागत अँम्रो इन्स्टिटयूटच्यावतीने केले. शेफ राईडचे देखील आयोजन करण्यात आलेले होते .

शहरातील मुख्य चौकातून सुरु झालेल्या राईडचा शेवट अँम्रो इन्स्टिटयूट करण्यात आला . या विविध उपक्रमात नाशिक मधील नामांकीत हॉटेलचे शेफ आणि व्यवस्थपक सहभागी झाले होते . यासाठी अँम्रो इन्स्टिटयूटचे कौतुक करावे तितके थोडेच आहे हॉटेल गेटवे , एक्सप्रेस इन् . बीएलव्हीडी , जिंजर , सुला यांच्यासह अन्य हॉटेलस चे व्यवस्थापक आणि शेफ यांत सक्रिय सहभागी होते. एस आर के किचन चे शुभांकर आनंद , क्रूझिंग गॉड्सचे प्रेसिडेंट मार्कंड उदावंत यांची टीम देखील कार्यक्रम आयोजनात अम्रो इन्स्टिटयूट सोबत होते .अँम्रो इंस्टीट्युटचे संस्थापक अध्यक्ष राजन सोनी यांना तीच खरी आदरांजली राहील . या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती अँम्रो इंस्टीट्युटच्या संचालिका प्रा सुनंदा सोनी मँडम आणि अँम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ .रोहन सोनी यांनी दिली

अँम्रो इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष स्व .राजन सोनी यांच्या जयंती निम्मित अन्य उपक्रम दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . समता ब्लड बँक आणि अँम्रो इन्स्टिटयूट अनेक वर्षांपासून रक्तदान शिबीर आयोजित करत आलेले आहे . रक्तदान शिबीर आयोजित केल्या नंतर शिक्षक , विद्यार्थी आणि प्राध्यपक वर्ग देखील रक्तदान करतात . प्राचार्य डॉ .रोहन सोनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाचा शुभारंभ करतात .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँम्रो इन्स्टिटयूट च्या संचालिका प्रा. सुनंदा सोनी आणि डॉ . रोहन सोनी यांच्या मार्गदर्शना खाली अँम्रो ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉ .गिरीश पाटील आणि प्रा. रीना सोनी प्रा.योगेश जोशी प्रा.गौरव दीक्षित प्रा. शिवदास काळे प्रा.पंकज शर्मा कार्यलय अधीक्षक भाविका सोनी , ग्रंथपाल मनिषा आष्टीकर कार्यालय प्रमुख कांचन संसारे आणि रतन गोडसे यांनी परिश्रम घेतले .

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News