“ओॲसिस फर्टिलिटी’ नाशिकमध्ये सुरू

Oct 4, 2023

पुण्यापाठोपाठ राज्यात तिसरे केंद्र नाशिकमध्ये

नाशिक : भारतातील प्रथम क्रमांकाची फर्टिलिटी चेन म्हणून स्थान पटकावलेल्या ओॲसिस फर्टिलिटीने पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये पाऊल ठेवले असून नाशिकमधील पूर्ण विकसित आयव्हीएफ सेंटर ओॲसिस फर्टिलिटी, ऑफिस नंबर ५ ते १०, २ आणि ३ ला मजला वेद स्पॅसेस अपार्टमेंट, ब्लॉक ए , शारदा निकेतन जवळ , गोविंद नगर नाशिक -४२२००९ येथे सुरू झाले आहे. या फर्टिलिटी चेनचा महाराष्ट्रात विस्तार होत असून तिचे पुण्यात दोन केंद्र आधीच अस्तित्वात आहेत. नाशिकमधील या नवीन केंद्रामध्ये प्रगत उपकरणे, अत्याधुनिक आयव्हीएफ प्रयोगशाळा असून त्यांना उत्कृष्ट फर्टिलिटी तज्ज्ञ आणि सर्वोत्कृष्ट भ्रूणशास्त्रज्ञांची जोड मिळाली आहे. सहानुभूती आणि काळजी यांच्यासह वैयक्तिक फर्टिलिटी उपचार प्रदान करण्यासाठी हे केंद्र पूर्णपणे तयार आहे.

ओॲसिस फर्टिलिटीच्या सह-संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा जी. राव, ओॲसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि क्लिनिकल एम्ब्रोयलॉजिस्ट डॉ. कृष्ण चैतन्य, ओॲसिस फर्टिलिटी, पुणेचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. निलेश उन्मेष बलकवडे, ओॲसिस फर्टिलिटी, नाशिकच्या क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. पल्लवी उंटवाल बेलदार आणि ओॲसिस फर्टिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुधाकर जाधव यांनी या केंद्राचे उद्घाटन केले.

या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ओॲसिस फर्टिलिटीच्या सह-संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा जी. राव म्हणाल्या, “नाशिकमध्ये आमचे हे केंद्र सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. अनियमित जीवनशैली, पालकत्वातील उशीर, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन, लठ्ठपणा, मधुमेह, पर्यावरणीय घटक इत्यादी कारणामुळे वंध्यत्व ही हळूहळू एक मोठी चिंतेची बाब बनत चालली आहे. आम्ही जोडप्यांचा आरोग्याची स्थिती, वय, जीवनशैली, बीएमआय आणि इतर घटक इत्यादींवर आधारित वैयक्तिक प्रजनन उपचार प्रदान करतो. एक वर्षानंतरही गर्भधारणा होऊ शकत नसेल तर नवरा-बायकोने पुढे येऊन फर्टिलिटी एक्सपर्टची मदत घेणे महत्त्वाचे ठरते. करिअरची उद्दिष्टे आणि आर्थिक जबाबदाऱ्या यांच्यामुळे आधुनिक जोडपी अपत्य जन्माला घालण्यास उशीर करतात. वयानुसार व्यक्तीची प्रजनन क्षमता कमी होते परंतु आपली प्रजनन क्षमता टिकवून ठेवून आपल्या सोयीनुसार नंतर गर्भ धारण करण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतो, हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे”.

ओॲसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि क्लिनिकल एम्ब्रोयलॉजिस्ट डॉ. कृष्ण चैतन्य म्हणाले, “या विशेष प्रसंगी उपस्थित असल्याचा खूप आनंद झाला. वंध्यत्व उपचाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र अनेक पुरुष आपल्या वंध्यत्वाच्या समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. अँड्रोलाईफ आमचे विशेष मेल फर्टिलिटी क्लिनिक असून त्या माध्यमातून आम्ही पुरुषांसाठी आवश्यक अवकाश आणि उपचार यांचे पर्याय उपलब्ध करून देतो. आयव्हीएफ मध्ये सर्वोत्तम भ्रूण निवडण्यासाठी आमच्याकडे पीजीटी (प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग) सारखे प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे यशाची शक्यता वाढू शकते. फर्टिलिटी प्रिझर्वेशन या प्रगत तंत्राद्वारे, आम्ही कर्करोगाच्या रुग्णांना त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवून नंतर पालक होण्यासाठी आशेचा किरण देतो.”

ओॲसिस फर्टिलिटी, पुणेचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. नीलेश उन्मेष बलकवडे म्हणाले, भारतात २ कोटी ८० लाख जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या आहे. मात्र भीती आणि जागरूकतेच्या अभावामुळे ३ टक्के पेक्षाही कमी लोक फर्टिलिटी सेंटरपर्यंत वंध्यत्वाभोवतीचा कलंक तोडणे महत्वाचे आहे. पुरुषांना पितृत्व प्राप्त करण्यात मदत करण्यासाठी आम्ही मायक्रोफ्लुइडिक्स आणि मायक्रोटीईएसई (मायक्रोसर्जिकल टेस्टिक्युलर स्पर्म एस्पिरेशन) यासारखी प्रगत तंत्रे प्रदान करतो. जंक फूडचे सेवन, धूम्रपान, मद्यपान आणि झोपेची अनियमित पद्धत यासारख्या जीवनशैलीतील घटकांचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”

अजून बातम्या वाचा..

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
Breaking News