नाशिकमधील मेडिलिव्ह हॉस्पिटलच्या २ रुग्णांचे ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे यशस्वी यकृत प्रत्यारोपण, रुग्णांना मिळाले जीवदान

Oct 13, 2023

नाशिक : नाशिक येथील सुप्रसिद्ध मेडिलिव्ह हॉस्पिटलच्या २ रुग्णांची ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. मेडिलिव्ह हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद अण्णा देशमुख (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हिपॅटोलॉजिस्ट) यांच्या सल्ल्यानुसार, ज्युपिटर हॉस्पिटलचे वरिष्ठ कन्सल्टस आणि क्लिनिकल लीड, डॉ.गुरुप्रसाद शेट्टी (एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण सर्जन) यांच्या टीमने या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने त्यांना नवे जीवन मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर आता दोन्ही रुग्ण आरोग्यदायी जीवन जगत आहेत.

याबाबत माहिती देण्यासाठी नाशिकच्या मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मेडिलिव्ह हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद ए. देशमुख यांनी पहिल्या रुग्णाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, निफाड तालुक्यातील एक ५२ वर्षीय रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांना वारंवार पोटात पाणी होणे, अशक्तपणा, अंगावर सूज येणे, कावीळ असे अनेक प्रकारचे त्रास होत होते. उपचारांतर्गत त्यांच्या शरीरावर कोणत्याही गोळ्या औषधांचा परिणाम होत नव्हता. यानंतर त्यांच्या विविध तपासण्या केल्या असता त्यांचे यकृत निकामी झाले असल्याचे आढळले. सर्व रिपोर्ट्स बघितल्यानंतर डॉ. शेट्टी यांच्याशी चर्चा करून रुग्णाला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला.

रुग्णाच्या मुलाने यकृताचा भाग दान देण्याची तयारी दाखवल्याने त्याच्या सर्व तपासण्या करून प्रत्यारोपण करण्याचा निर्णय झाला. मात्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची शारीरिक परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. त्यामुळे डॉ. देशमुख यांनी रुग्णावर योग्य उपचार करून रुग्णाला शस्त्रक्रिया करण्यायोग्य सक्षम केले. यानंतर रुग्णाला मुंबईतील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यास पाठवण्यात आले. तेथे रुग्णावर डॉ. शेट्टी आणि त्यांच्या टीमने रुग्णाचे यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले. यानंतर पुढील उपचारांसाठी रुग्ण परत नाशिकच्या मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये आला. सध्या शस्त्रक्रिया होऊन ३ महिने उलटले असून, लिव्हर डोनर म्हणजेच रुग्णाचा मुलगा आणि रुग्ण दोघांची प्रकृती अतिशय उत्तम आहे.

दुसऱ्या केसमधील रुग्ण गेले ३ वर्ष यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. यकृत निकामी, रक्ताच्या उलट्या, पायावर सूज, पोटात पाणी, कावीळ, डोळे पिवळे होणे, अशक्तपणा, जवळजवळ ५-६ वेळा गुंगीत, अशा गंभीर अवस्थेत मेडिलिव्ह हॉस्पिटलला त्यांना दाखल करण्यात आले. डॉ. शरद देशमुख यांनी या रुग्णालादेखील यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांनी रुग्णाची तपासणी करून प्रत्यारोपण करण्याचा निर्णय झाला. सगळ्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. रुग्णाच्या पत्नीने यकृत दान करायचे ठरवले. दोघांच्या रक्त व इतर जुळवणी झाल्यानंतर जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे डॉ. शेट्टी यांनी यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्ण व त्याची पत्नी दोघेही अगदी उत्तम आहेत. डॉ. शरद देशमुख व डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांच्यामुळे दोन्ही रुग्णांना जीवनदान मिळाले. यकृत प्रत्यारोपण झालेल्या रुग्णानी स्वतः उपस्थित राहून आपले अनुभव कथन केले. डॉ. गुरुप्रसाद शेट्टी हे महिन्यातून दोनदा नाशिकला मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये रुग्ण तपासणीसाठी येत असतात. लिव्हरचा कोणताही त्रास असल्यास मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध
मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये पोटाच्या व लिव्हरच्या आजारासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. यात अॅडव्हान्स एण्डोस्कोपी सिस्टिम, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, मॅनोमेट्री, लिव्हर फायब्रोस्कॅन, सुसज्ज लिव्हर आयसीयु, ऑपरेशन थिएटर, पोटाचे उपचार जसे असिडिटी, अपचन, पॅक्रियाटाटिस ,पोटाचे अल्सर, कर्करोग, गिळण्यास त्रास होणे, उलटी, शौचामध्ये रक्त जाणे,वजन कमी होणे, बद्धकोष्ठता, पित्ताशयातील खडे, फिशर, पाइल्स, अपेन्डिक्स, हर्निया तसेच लिव्हरचे आजार जसे कावीळ हिपेटायटिस (बी.सी) पोटात पाणी होणे लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर यासारख्या आजारांवर यशस्वी उपचार मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये डॉ. शरद देशमुख यांच्याद्वारे केले जातात.

 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News