उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण ; नाशिकच्या बॉर्नीओ रुग्णालयात अंडरवॉटर डिलेव्हरी सुविधा

Nov 7, 2023

नाशिक : नुकतेच नव्याने सुरु झालेले बॉर्नीओ माता आणि बाल रुग्णालय येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिली अंडरवॉटर डिलिव्हरी म्हणजेच पाण्याखालील बाळंतपण दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉ. श्रद्धा सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. गर्भवती महिला सौ. संध्या गायकवाड या प्रसूतीसाठी दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉर्नीओ माता आणि बाल रुग्णालय नाशिक येथे दाखल झाल्या. प्रसूतीपूर्व वेदना असल्याने त्यांना तत्काळ लेबर रूम मध्ये हलविण्यात आले.

बॉर्नीओ रुग्णालयात नॉर्मल / नॅच्युरल प्रसूती साठी प्राधान्य दिले जाते, नॅच्युरल प्रसूती म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या गर्भवतीची घरात प्रसूती होते व तिला कुठल्याही औषधांची गरज पडत नाही तशाच पद्धतीची प्रसूती पण ती वेदनारहित व सुरक्षित व्हावी यासाठी बॉर्नीओ रुग्णालयात सुसज्ज असे LDRP (लेबर डेलिव्हरी रिकव्हरी आणि पोस्ट नेटल केअर) रूम सूट उभे करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये गर्भवतीची प्रसूती व प्रसूतिनंतरची काळजी त्याच रूम मध्ये घेतली जाते व तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविले जात नाही. जेणेकरून तिला परिवरासोबत घरी असल्याचा अनुभव येतो. LDRP सूट मध्येच पाण्याखालील प्रसूतीसाठी अत्याधुनिक अशा बरदिंग टब ची व्यवस्था बॉर्नीओ रुग्णालयात आहे. सदरील गर्भवती सौ. संध्या हिस डॉक्टरांनी पाण्याखालील प्रसूतिविषयी व त्याच्या विलक्षण फायद्यांविषयी समजावून सांगितले, आणि नातेवाईक आणि गर्भवतीच्या संमती नंतर तिला बरदिंग टब मध्ये प्रसूतीसाठी हलविले. यानंतर दुपारी ३.११ मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. आता आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.

या प्रसंगी बोलताना डॉ श्रद्धा सबनीस यांनी असे सांगितले कि लेबर रूम मधील प्रसूती आणि पाण्याखालील प्रसूती यातील मोठा फरक लक्षात घेतला तर पाण्याखालील प्रसूती ही आईसाठी अत्यंत आरामदायी आहे. या प्रसुतीदरम्यान पाण्याच्या तापमानाचे सतत निरीक्षण केले जाते. या गरम पाण्यामुळे आईच्या सांध्यावर आणि स्नायूवर दबाव येत नाही. तसेच पाण्याच्या स्पर्शाने मानसिक ताणही कमी होतो, प्रसूतिच्या वेदनांचा प्रभाव ही कमी होतो आणि प्रसूती अतिशय सोप्यापद्धतीने पार पडते.

या प्रसूतीसाठी बॉर्नीओच्या ऑपरेशन थिएटर मधील सर्व स्टाफ, डॉक्टर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अवघ्या २ महिन्या आधी सुरु झालेले बोर्निओ हॉस्पिटल हे एकूण ५० खाटांचे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहे. यातील २४ खाटा NICU (नवजात शिशु विभाग), ७ खाटा PICU, २ ऑपरेशन थिएटर, ३ LDRP रूम, Suite रूम, सुपर डीलक्स व डीलक्स रूम आणि २४*७ काळजी घेणारी तज्ज्ञयानंची टीम आहे.

काय आहे फायदे अंडरवॉटर डिलेव्हरीचे ?
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या स्त्रियांना पाण्यात प्रसव होते त्यांना कमी वेदनाशामक औषधांची आवश्यकता असते आणि त्यांना प्रसूतीचा कालावधीतील वेदना कमी लागतात. कोमट पाण्याने अनेक स्त्रियांसाठी बाळंतपण सुखदायक असते . बाळंतपण होतांना स्नायूंना शेक मिळाल्याने प्रसरण पावणे सुखद होते आधार फार इतके कष्ट करावे लागत नाहीत

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News