बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठ रुग्णाला मिळाले जीवनदान ; ज्युपिटर हॉस्पिटलची यशस्वी कामगिरी

Nov 7, 2023

• डॉ. प्रशांत साळवी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकला लठ्ठपणामुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल

नाशिक : नाशिकमध्ये दुर्धर स्थूलतेने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या त्यामुळे रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
यातील पहिली रुग्ण ही १४ वर्षांची मुलगी होती. तिचे वजन १४५ किलो असून तिला गंभीर अवरोधक स्लीप अॅप्निया (ओएसए) होता. त्यामुळे ती बसलेल्या स्थितीत झोपायची. ती जमिनीवर बसायची आणि सोफ्याच्या काठाला टेकून बसायची. अशा पद्धतीनेच ती झोपायची. वाढलेल्या वजनामुळे तिला चालायला त्रास होत होता. त्यामुळे ती चालणे टाळायची. पायऱ्या चढणेसुद्धा तिला अवघड होऊ लागले होते.

जन्माच्या वेळी ती सामान्य बाळांसारखीच होती आणि तिचे वजन २.४५ किलो होते. पण जसजसे ती वाढू लागली तसतसे तिचे वजन वाढू लागले. तिचे पालक काळजीत पडले आणि वयाच्या चौथ्या वर्षी तिचा प्राडर विली सिंड्रोमसाठी अनुवांशिक अभ्यास करण्यात आला. तो नकारात्मक आला. तिचे वजन हळूहळू वाढत गेले आणि आता १४ व्या वर्षी तिचे वजन १४५ किलो आणि बीएमआय ६६.२२ निघाले. (सामान्य बीएमआय १८.५ -२४.९ असतो.)

या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना ज्युपिटर हॉस्पिटलचे कन्सल्टंट मिनिमल इनवेसिव्ह, मेटाबॉलिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. प्रशांत साळवी म्हणाले, “मी तिला पहिल्यांदा नाशिक येथील माझ्या बॅरिअॅट्रिक सपोर्ट ग्रुपमध्ये पाहिले. तेव्हा तिचे सामान्यपेक्षा ७० किलो वजन जास्त होते, तिला तीव्र ओएसए, उच्च कोलेस्टेरॉल, चरबीदार यकृत, हायपोथायरॉईडीझम, गंभीर पीसीओडी, आणि परिश्रम झाल्यावर डिस्प्निया असल्याचे आम्हाला आढळले. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया आणि वजन कमी करण्याच्या सर्जिकल उपायांमुळे लठ्ठपणाशी संबंधित सर्व समस्या कशा दूर होतील याबद्दल तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.“

ते पुढे म्हणाले, “डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने पूर्ण ऑप्टिमायझेशन केल्यानंतर तिच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर तिसर्‍याच दिवशी तिला उत्तम स्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.”

शस्त्रक्रियेला ६ महिने पूर्ण झाले असुन तिने ३० किलो वजन ने कमी केल्यामुळे ती आत्ता शाळेला पण जाऊ लागली आहे तिच्या झोपेमध्ये सुधारणा झाली असून शस्त्रक्रियेनंतर पहिल्या महिन्यातच ती सामान्यपणे बेडवर झोपू लागली आहे. ठाणे आणि नाशिकसह बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करणारी ती शहरातील सर्वात तरुण रुग्ण आहे.“

आणखी एका गंभीर प्रकरणात, ६४ वर्षांचे श्री. सुरेश वडनेरे यांचे आयुष्य झोपेच्या समस्येमुळे त्रासून गेले होते. आठ वर्षांपूर्वी त्यांना गंभीर अवरोधक स्लीप अॅप्निया (ओएसए) सेव्हेअर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी त्यांना सीअँप नावाच्या मशिनची गरज पडत असे. त्याचे वजन ९९.६ किलो आणि बीएमआय ३५.२ केजी /एम २ होता.

डॉ. साळवी म्हणाले, “जेव्हा त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडून तपासणी करून घेतली तेव्हा डोळे लाल आणि पाणीयुक्त दिसून आले. सीअँप मशीनचा वापर करूनही आपण शांतपणे झोपू शकत नाही, ही त्यांची मुख्य तक्रार होती. त्यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या शरीरातील चरबीचे विश्लेषण आमच्या हाती आले तेव्हा मिळाले वजन कमी करण्यासाठी आणि सीपीएपी मशीनपासून मुक्त होण्यासाठी बॅरियाट्रिक सर्जरीचा पर्याय आम्ही त्यांना सुचविला.“

बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर १५ दिवसांतच सीपीएपी मशीनचा वापर न करता ते शांतपणे झोपू लागले. शस्त्रक्रियेच्या ८ महिन्यांनंतर आता त्यांचे वजन अंदाजे. ७४ किलो आहे. आता ते अधिक निरोगी आणि सक्रिय आहेत.
आणखी एका यशस्वी शस्त्रक्रियेत, ४० वर्षीय अनिता वाणी यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, पीसीओडी यांचा त्रास होता. त्यांचे वजन ११५ किलो आणि बीएमआय ४२.९१ केजी/एम२ होता. त्यांची मासिक पाळी अनियमित होती आणि वजनामुळे त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले होते. त्यांना औषधोपचार सुरू होता. साध्या चालण्यामुळेही त्यांचा श्वास वर होऊ लागला आणि आयुष्यातील या वाढत्या समस्यांमुळे त्यांना नैराश्य येऊ लागले.

तपासणीनंतर त्यांच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर २ वर्षांनी त्यांचे कमी झालेले वजन शाबूत आहे आणि त्या खूप सक्रिय आणि निरोगी आहेत. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मधुमेह बरा झाला आणि शस्त्रक्रियेच्या तिसर्‍या दिवशी त्या साखरेकरिता कोणतेही औषध न घेता घरी गेल्या. शस्त्रक्रियेनंतर ३ महिन्यांनी त्यांची हायपरटेन्शनची औषधेही बंद करण्यात आली आणि पीसीओडी पूर्णपणे बरा झाला.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News