नाशिकमध्ये महाक्रिटीकॉन २०२३ राज्यस्तरीय परिषदेचे शुक्रवारपासून आयोजन

Nov 22, 2023

अत्याधुनिक अतिदक्षता उपचाराबाबतचे तज्ञांकडून मिळणार मार्गदर्शन

नाशिक– इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) यांच्या नाशिक शाखेच्या वतीने अकराव्या महाक्रिटीकॉन २०२३ या राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन केले आहे. येत्या २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ही परीषद पार पडणार असून, आपात्कालीन परीस्थितीतील उपचारांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा व व्याख्यान, समूह चर्चेतून मार्गदर्शन करणार आहेत. ’कोलॅबरेटिव्ह ट्रासफॉर्मेशन इन क्रिटिकल केअर मेडिसिन’ अशी या परीषदेची संकल्पना असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.यतिंद्र दुबे, आयोजन समितीचे सचिव डॉ.पंकज राणे यांनी दिली.

या परीषदेसाठी आयएससीसीएम नाशिकचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघ, सचिव डॉ.रुचिरा खासणे, महाक्रिटीकॉनचे सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ.देवदत्त चाफेकर, खजिनदार डॉ.हितेंद्र महाजन तर आयोजन समिती सदस्य डॉ.अभिनंदन मुथा, डॉ.भाविक शाह, डॉ.मकरंद राणे, डॉ.महेश बनसोड, डॉ.स्वप्निल साखला, डॉ.विलास कुशारे हे परीश्रम घेत आहेत.
यापूर्वी नाशिक शाखेतर्फे २०१५ मध्ये तिसर्या महाक्रिकटीकॉन या राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन केले होते. तेव्हा ’क्रिटीकल केअर इन रिसोर्सेस लिमिटेड सेटींग्स’ अशी परीषदेची संकल्पना होती. पुन्हा एकदा नाशिक शाखेला राज्यस्तरीय परीषद आयोजित करण्याचा बहुमान मिळालेला आहे.
या परीषदेअंतर्गत २४ नोव्हेंबरला विविध विषयांवरील कार्यशाळा पार पडणार आहेत. काही कार्यशाळा परीषद स्थळ असलेल्या एक्स्प्रेस इन येथील विविध सभागृहांमध्ये पार पडतील. तर प्रात्येक्षिकांवर आधारित काही कार्यशाळा या थेट आयसीयूतून प्रक्षेपित केल्या जातील.
२५ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजतापासून सत्रांना सुरुवात होईल. तर या दिवशी सायंकाळी सहा वाजता परीषदेचा औपचारीक उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरलाही विविध सत्रांवरील परीसंवाद पार पडतील.

हया विषयांवर होणार परीषदेत ज्ञानाची अदानप्रदान
या परीषदेमध्ये आपात्कालीन वैद्यकीय उपचार याविषयाच्या विविध पैलूंना स्पर्श केला जाणार आहे. यामध्ये अपघातातील अत्यावस्थ रुग्णांना द्यावयाचे तातडीचे वैद्यकीय उपचारापासून प्रसुतीदरम्यान उद्भवणारी गुंतागुंत, हृदयविकार, मेंदूविकाराशी निगडित आपात्कालीन परीस्थितीतील उपचाराची दिशा, रक्तविकार संस्थेची तसेच पॅथेलॉजीची उपचार प्रक्रियेतील भूमिका अशा विविध विषयांचा अर्ंतभाव या परीषदेत केला आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News