अत्‍यावस्‍थ रुग्‍णांवर उपचाराबाबत कार्यशाळेतून तज्ञांचे मार्गदर्शन

Nov 24, 2023

महाक्रिटीकॉन परीषदेचे आज औपचारीक उद्‌घाटन

नाशिक- इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) यांच्‍या नाशिक शाखेच्‍या वतीने आयोजित अकराव्‍या महाक्रिटीकॉन २०२३ या राज्‍यस्‍तरीय परीषदेनिमित्त शुक्रवारी (दि.24 नोव्हेंबर) विविध विषयांवरील कार्यशाळा पार पडल्‍या. वेगवेगळ्या सहा संकल्‍पनांवर आधारित कार्यशाळांमध्ये तजांनी परीषदेत सहभागी डॉक्‍टरांना मार्गदर्शन केले. या परिषदेत राज्यभरातून ८०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविताना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शनिवारी या परीषदेचा औपचारीक उद्‌घाटन समारंभ पार पडणार आहे.

या तीन दिवसीय परीषदेच्‍या पहिल्‍या दिवशी हॉटेल एक्‍स्‍प्रेस इन येथील विविध सभागृहांमध्ये कार्यशाळांचे आयोजन केले होते. अपघातातील अत्‍यावस्‍थ रुग्‍णांवर प्रभावी उपचार, आपत्‍कालीन विभागात सोनोग्राफी व इतर यंत्रांचा वापर, प्रसुतीदरम्‍यान उद्‌भवणार्या गुंतागुंती हाताळण्याच्‍या उपाययोजना, मॅकॅनिकल व्‍हेंटीलेशन, आयसीयुमध्ये संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना आदी विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्‍या.

परीषदेला दीपप्रज्‍वलनाने सुरुवात झाली. परीषदेच्‍या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.यतिंद्र दुबे, आयोजन समितीचे सचिव डॉ.पंकज राणे यांच्‍यासह आयएससीसीएम नाशिकचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघ, सचिव डॉ.रुचिरा खासणे, महाक्रिटीकॉनचे सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ.देवदत्त चाफेकर, खजिनदार डॉ.हितेंद्र महाजन, परीषद आयोजन समिती सदस्‍य डॉ.अभिनंदन मुथा, डॉ.भाविक शाह, डॉ.मकरंद राणे, डॉ.महेश बनसोड, डॉ.स्‍वप्‍निल साखला, डॉ.विकास कुशारे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. ‘कोलॅबरेटिव्‍ह ट्रासफॉर्मेशन इन क्रिटिकल केअर मेडिसिन’ या संकल्‍पनेवर आधारित ही कार्यशाळा होते आहे. परीषदेच्या औपचारीक उद्‌घाटन सोहळ्या दिल्‍ली येथील प्रसिद्ध ट्रान्‍सप्‍लांट सर्जन डॉ. अमरेंदरसिंग सोइन उपस्‍थित राहाणार आहेत. पुढील दोन दिवस या परीषदेअंतर्गत विविध विषयांवर सत्र आयोजित केले असून, ९० हून अधिक वक्‍ते हे परीषदेत सहभागी झालेल्‍या डॉक्‍टरांना मार्गदर्शन करतील.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News