जगदगुरु जर्नादन स्वामी मौनगिरीजी यांच्या पुण्यस्मरण सोळयानिमित्त नाशिकमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 7, 2023

श्रीराम कथेचे १७ डिसेंबरपासून आयोजन आयोजन ; शांतिगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत होणार सोहळा

नाशिक : जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्‍यस्मरण सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले आहे. नाशिक शहरातील कुंभमेळा मैदानावर १७ ते २४ डिसेंबर दरम्यान होणा-या या भव्य सोहळया प्रसंगी श्रीराम कथा, जपानुष्ठान, यज्ञ यांसह विविधांगी भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहे.
धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर समर्थ सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील कुंभमेळा मैदान येथे १७ ते २४ डिसेंबरदरम्यान जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले आहे. हया सोळया दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिध्द रामायनाचार्य ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांच्या मधुर वाणीतून १७ डिसेंबरपासून रोज १२ ते ३ वाजेदरम्यान श्रीराम कथा संपन्न होणार आहे.महाजपानुष्ठान,१०८ कुंडात्मक कार्यसिध्दी महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, नामसंकीर्तन, अभिषेक, भागवत वाचन, ध्यान प्राणायाम, सत्संग, श्रमदान यांसह भरगच्च कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात ५३ तालुक्यातील भाविकांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमादरम्यान येणा-या भाविकांसाठी शेकडो क्विंटल साखरे पासून बनवलेल्या बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

नाशिक : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) या आघाडीच्या एफएमसीजी...

read more
धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
Breaking News