अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे स्वतंत्र पोट व यकृत विभाग सुरू

Dec 22, 2023

नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्याची बांधिलकी जपत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सर्व सोयी सुविधायुक्त स्वतंत्र पोट व यकृत विभागाची सुरवात करण्यात आली आहे. या विभागात पोट व यकृत संबंधित विकार, यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी सर्वसमावेशक आणि विशेष काळजी प्रदान करणे, अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आणणे, हे या विभागाचे उद्दिष्ट आहे. जे त्याच्या व्यापक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे चेअरमन श्री अशोक कटारिया यांच्या शुभहस्ते गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे उदघाटन करण्यात आले. मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख, केंद्र प्रमुख डॉ. सौरभ नगर आणि पोट व यकृत विकार तज्ञ व विभाग प्रमुख डॉ. तुषार संकलेचा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रगत आरोग्य सेवा सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या हॉस्पिटलच्या वचनबद्धतेबद्दल उत्साह व्यक्त करताना अशोक कटारिया म्हणाले, “अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात प्रगती पाहताना या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग होताना मला आनंद होत आहे. स्वतंत्र गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाची सुरवात ही समाजाच्या कल्याणासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे सर्वसमावेशक आणि रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असलेली एक आघाडीची आरोग्य सेवा आहे. नवोपक्रम आणि उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करून, आरोग्य सेवा उद्योगात नवीन बेंचमार्क त्यांनी स्थापित केला आहे.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख यांनीही यावेळी आपले विचार मांडले, ते म्हणाले, “स्वतंत्र गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा विभाग अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. पोट व यकृत विकाराने आजारी रूग्णांसाठी अत्याधुनिक उपचार आणि सुविधा देण्यासाठी सज्ज आहे. तसेच यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे अशा रुग्णांसाठी नाशिकमध्येच शक्य तितकी सर्वोत्तम आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळेल यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांची आर्थिक व वेळेची बचत होईल.

विभागाचे नेतृत्व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. तुषार संकलेचा करणार आहेत. या प्रसंगी ते म्हणाले, “या विभागाचा एक भाग होण्याचा मला अभिमान वाटतो. आमची टीम जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. पोट व यकृताच्या आजार असलेल्या रुग्णांना उच्च स्तरावरील काळजी प्रदान करण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रच्या साह्याने आमचा अनुभव, नावीन्य व कुशल डॉक्टरांची टीम रुग्णांना सर्वोत्तम रुग्णसेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आमचे लक्ष वैयक्तिकृत आणि प्रगत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिकल उपचार, नवीनतम तंत्रज्ञान आणि वैद्यकीय प्रगतीचा वापर करण्यावर आहे.” पुढे ते म्हणाले या विभागात एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी , इआरसिपी, या प्रोसिजर पूर्वी हि होत होत्या परंतु आता त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे कॅप्सूल एंडोस्कोपी, फायब्रोस्कॅन, मॅनोमेट्री, हायड्रोजन ब्रीथ टेस्ट, यांचा समावेश आता या विभागात करण्यात आला आहे. त्या मुळे रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या सहाय्याने उपचार करणे सोईचे होणार आहे.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. सौरभ नगर यांनी हॉस्पिटलच्या उत्कृष्टतेवर भर दिला. “स्वतंत्र गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग हे एका छताखाली सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या आमच्या चालू प्रयत्नांचा पुरावा आहे. हा विभाग आमच्या रुग्णांच्या एकूण आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी योगदान देईल,स्वतंत्र गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग पोट , यकृत आणि स्वादुपिंड च्या आजारी रुग्णांना हाताळण्यासाठी व निदान प्रक्रिया, वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्व निदान अशी विस्तृत आरोग्य सेवा प्रदान करेल.

उपस्थित मान्यवर डॉक्टर्स व पत्रकार यांचे आभार मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर यांनी केले. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मधील सर्व विभाग प्रमुख , डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी या उदघाटन सभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News