२ वर्षीय चिमुकल्‍याच्‍या फुफ्फुसातून दुर्बिणीव्दारे काढला नारळाचा तुकडा

Dec 29, 2023

नारायणी हॉस्‍पिटलमध्ये डॉ.स्‍वप्‍निल साखलांच्या प्रयत्नाना यश

नाशिक– भरपुर उपचार घेऊनही खोकला थांबत नसल्‍याने दोन वर्षीय बालकाचे पालक कासावीस झाले होते. संगमनेर तालुक्‍यातील अकोले येथील या बालकाला स्‍थानिक डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानुसार नाशिकच्‍या नारायणी हॉस्‍पिटल येथे डॉ.स्‍वप्‍निल साखला यांच्‍याकडे तपासणीसाठी आणले. फुफ्फुसात नारळाचा तुकडा आढळल्‍याचे निदान करतांना कुठलीही चिरफाड न करता अत्‍याधुनिक स्‍वरुपाच्‍या ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे बालकावर यशस्‍वी उपचार करण्यात आले असून, १२ तासांच्‍या आत घरी सोडण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना नारायणी हॉस्‍पिटलचे संचालक व फुफ्फुसविकार तज्‍ज्ञ डॉ. स्‍वप्‍निल साखला म्‍हणाले, दोन वर्षीय बालकाचा खोकला थांबत नसल्‍याने त्‍याच्‍या पालकांनी स्‍थानिक बालरोग तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेतला. यावेळी डॉ.देशपांडे व डॉ.अमेय देशमुख यांनी त्‍यांना सिटीस्‍कॅन करण्याचा सल्‍ला दिला. या चाचणीमध्ये फुफ्फुसात उजव्‍या बाजूला काहीतरी अडकलेले असल्‍याचे आढळून आले. उत्तरीय उपचारासाठी डॉक्‍टरांनी नाशिकला नारायणी हॉस्‍पिटलला भेट देण्याचा सल्‍ला दिला.

त्‍यानुसार बालरुग्‍णासोबत त्‍याचे पालक नारायणी हॉस्‍पिटलमध्ये आले. वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केल्‍यानंतर फुफ्फुसात नारळाचा तुकडा अडकल्‍याचे लक्षात आले. उपचाराची प्रक्रिया पालकांना समजावून सांगतांना पुढील एक तासाच्‍या आत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. विशेष म्‍हणजे अडकलेला तुकडा काढण्यासाठी कुठलीही चिरफाड करण्यात आली नाही. हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या क्‍लायो कंपनीच्‍या अत्‍याधुनिक स्‍वरुपाच्‍या मशीनच्या सहाय्याने ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे नारळाचा तुकडा काढण्यात आला. यानंतर बालकाला काही क्षणात मोकळ्याने श्‍वास घेता येऊ लागला व तब्‍येतीत सुधारणा जाणवली. यशस्‍वी उपचार केल्‍यानंतर अवघ्या १२ तासांत त्‍याला डिस्‍चार्ज दिला जातो आहे.

याबाबत रुग्‍णाच्‍या पालकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बालकाच्‍या वेदना टळल्‍या व काही तासात तो सामान्‍य जीवन जगण्या सज्‍ज झाल्‍याबद्दल पालकांनी डॉ.स्‍वप्‍निल साखला आणि नारायणी हॉस्‍पिटलच्‍या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News