येत्या गुरुवारी सहस्त्रदिपांनी उजळणार रामकुंड ; अक्षय उर्जा फाउंडेशनच्या वतीने गंगाआरती

Jan 9, 2024

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदाेत्सव

प्रतिनिधी । नाशिक बहुप्रतीक्षित अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्रभु रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या या सोहळा मोठ्या उत्हासात साजरा करण्याचे अावाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यालाच प्रतिसाद देत अक्षय ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी दि. ११ सायंकाळी ६ वाजता गाेदाकाठी सहस्त्रदिप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बरोबरच गंगाआरतीसह फटाक्यांची आतिषबाजी करत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अानंद साजरा करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली.

संपूर्ण जगाचे लक्ष अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा साेहळ्याकडे लागले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम लल्ला हे मंदिरात विराजमान होणार आहे. प्रत्येक नागरिकांसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. याचमुळे ११ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम उपक्रम, कार्यक्रमद्वारे आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.याचसाठी पुढाकार शहरात सर्वांत पहिले अक्षय फांउडेशनच्या वतीने गाेदाकाठी दीपप्रज्वलीत केले जाणार आहे. याच बराेबर मंत्राेच्चरात पुजन व गंगा आरती होणार आहे. या साेहळ्याच्या माध्यमातून नागरिकांना राम मंदिर साेहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले जाणार आहे. या साेहळ्यात नाशिककरांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दीपप्रज्वलनातून साजरा केला जाणार आनंदोत्सव मंदिरात प्रभूरामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा ऐतिहासिक क्षण आहे. या साेहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी गोदाकाठी हजारो दिवे प्रज्वलीत केले जाणार आहे. नाशिककरांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे.
                              – अनिल जाधव, अध्यक्ष, अक्षय ऊर्जा फाऊंडेशन”

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News