मृत्यूशी झुंजणाऱ्या शेतकर्‍याला लाभले नावे आयुष्य वोक्हार्ट हॉस्पिटल मुळेच पुनर्जन्म झाल्याचे त्यानी सांगितले

Sep 16, 2019

नाशिक – ‘काळ आला पण वेळ आली नाही’ याचीच काहीशी प्रचिती वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे नुकतीच बघावयास मिळाली. कळवण तालुक्यातील 34 वर्षीय शेतकरी श्री. देवीदास सोमनाथ बहिरम यांना स्वाइन-फ्लू मुळे निमोनिया झाल्याचे निदान झाले. हे संक्रमण एवढे गांभीर होते की या संक्रमणामुळे त्यांचे इतर अवयव सुद्धा प्रभावित झाले होते. ताप, खोकला, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास अशा सर्व लक्षणांसाठी ते गावातील एका डॉक्टरांकडून उपचार घेत होते आणि आजारपण वाढल्यावर त्यांना तेथेच दाखल करून घेण्यात आले. प्रकृती गंभीर होत असल्या कारणाने तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे हलविण्याचा सल्ला दिला.

जेव्हा वोक्हार्ट हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागची टीम त्यांना आणण्यास गेली तेव्हा रुग्णाचा रक्तदाब खूप कमी आहे असे लक्षात आले आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुद्धा फारच कमी होते, परिणामी त्यांना 104 डिग्री एवढा ताप होता आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते किंबहुना कोमा मध्ये होते असे ही म्हणायला हरकत नाही. अशा रुग्णाला स्थलांतरित करणे म्हणजे खूप जोखमीचे असते कारण अश्यावेळी हृदयक्रिया बंद पाडण्याचा धोका असतो ज्याला आपण ‘कार्डिअॅक अरेस्ट’ असे म्हणतो. परंतु वोक्हार्ट हॉस्पिटलच्या ईमर्जन्सी विभागाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी हे शिवधनुष्य उचलेले आणि रुग्णाला सुखरूप हॉस्पिटलमध्ये आणले.

हॉस्पिटलमध्ये आल्यावर रुग्णाला उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेल्या फिजिशियन डॉ. सुदर्शना पाटील यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र अश्या संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांसाठी खास बनवलेल्या अतिदक्षता विभागात अ‍ॅडमिट करण्यात आले आणि तात्काळ उपचार सुरू झाले. स्वाइन-फ्लू आणि निमोनिया बरोबरच त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर सुद्धा झालेला होता, हृदयाचे पंपिंग कमी झालेले (मायोकार्डायटिस) आणि जंतूसंसर्गामुळे मेंदूचे कार्यही बिघडलेले होते. अश्या परिस्थितीमध्ये व्हेंटीलेटर सपोर्ट बरोबर सुसज्ज अतिदक्षता विभाग, किडनी डायलिसिस अश्या सर्व सुविधा तर उपलब्ध होत्याच शिवाय तज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग टीम, फिजिओथेरपीची तज्ञ या सर्वांनी सतत 10 दिवस रूग्णाची काळजी घेतली. हळूहळू रुग्णाची प्रकृती सुधारली आणि त्यांना 3 आठवड्यानंतर हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज देण्यात आले. अशा  गंभीर  प्रकृतीत येणार्‍या रूग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालयात विशिष्ट शिष्टाचार ठरवलेले आहेत. या बरोबर गंभीर रूग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता असते असे डॉ. सुदर्शना पाटील यांनी सांगितले. जाता-जाता रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत ‘पुनर्जन्म मिळाल्याचे उद्गार काढले’.या प्रसंगी बोलताना येथील केंद्रप्रमुख श्री. विनोद सावंतवाडकर म्हणाले की योग्य त्या वेळेत रुग्णाला वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्याचा निर्णयामुळे रूग्ण एवढ्या गंभीर आजारपणातून सुखरूप बाहेर निघाला. स्वाइन फ्लू सारख्या घातक संसर्गजन्य रोगावर उपचार करण्यासाठी येथे विशिष्ट आणि वेगळा अतिदक्षता विभाग आहे आणि सोबतच अत्याधुनिक यंत्रणा जसे की गरज लागल्यास इक्मो मशीन (एक्स्ट्रा कोर्पोरीयल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशन) आणि व्हेंटीलेटर सुद्धा उपलब्ध आहे. या सर्व बाबींमुळेच वोक्हार्ट हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील रूग्णांमध्ये पहिल्या पसंतीचे रुग्णालय आहे.

 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News