सोपान योग महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

Jan 19, 2024

नाशिक : नागपूर, रामटेक येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाअंतर्गत सिडको, सिंहस्थनगर येथील सोपान योग महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या एम. ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून, त्यामध्ये महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. याशिवाय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. एम. ए. योगशास्त्र द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रामध्ये डॉ. पल्लवी विशाल जाधव (८६.६ टक्के), छाया भास्कर झाल्टे (८४.४ टक्के) व राजेंद्र आबा काळे (८४ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य यू. के. आहिरे, अध्यक्ष कैलास जाधव, मार्गदर्शक डॉ. विशाल जाधव, प्रा. राज सिन्नरकर, तुषार विसपुते, चैतन्य कुलकर्णी, राधिका अंभोरे, प्रीती चांदोरकर, रश्मी दुसाने आदींनी अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
Breaking News