अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ट्रॅफिक बॅरिगेट्स भेट

Jan 24, 2024

शिर्डी शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या तर्फे शिर्डी पोलिसांना  ट्रॅफिक बॅरिगेट्स भेट

Nashik   : मेडिकव्हर हॉस्पिटल हा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आरोग्यसेवा देणारा समूह आहे आणि १२ देशांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करत आहे.  जर्मनी, स्वीडन, पोलंड, तुर्की, बेलारूस, बल्गेरिया, जॉर्जिया, हंगेरी, रोमानिया, सर्बिया, मोल्दोव्हा, युक्रेन आणि भारत. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे  भारतातील आघाडीचे  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समूहाचा भाग आहे. मेडिकव्हर रुग्णालये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात पसरलेली आहेत आणि दरवर्षी लाखो रुग्णांवर या रुग्णालयातून उपचार करण्यात येतात. भारतातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यावर आमचे विशेष लक्ष आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व अनुभवी डॉक्टरांचा सहभाग आमच्या समूहात आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय माहितीच्या आधारावर  व प्रोटोकॉल नुसार आम्ही कार्य करत आहोत.

आरोग्यसेवा करत असताना सामाजिक जाणीव ठेऊन मेडिकव्हर समूह समाजातील घटकासाठी नेहमी आपले दायित्व जपत आले आहे,याच अनुषंगाने  सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक विभागासाठी शिर्डी शहरातील  रहदारी सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या वतीने  ट्रॅफिक  बॅरिगेट्स हस्तांतरित सोहळ्याचे आयोजन दिनांक २३ जानेवारी  २०२३ रोजी दुपारी २ :०० वाजता पोलीस मुख्यालय , शिर्डी  येथे करण्यात आले होते . हा  सोहळा  माननीय श्री रामकृष्ण कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला , या प्रसंगी उपस्थित समूहास संबोधित करताना ते म्हणाले कि, ट्रॅफिक  बॅरिगेट्स मुळे शिर्डी शहरात वाहतुकीचे  नियोजन करत असताना, वाहतूक  सुरक्षित आणि सुरळीत होण्यास निश्चितच मदत  होणार आहे.  या हस्तांतर सोहळ्यास  केंद्र प्रमुख सौरभ नागर , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर , सहा.  पोलीस निरीक्षक सागर काळे ,सहा. पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहा.पोलीस निरीक्षक संभाजी पाटील व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर , पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News