Nashik : नाशिक पेन केअर सेंटर चे संचालक व नाशिक मधील प्रसिद्ध स्पाइन अँड पेन फिजिशियन डॉ. विशाल गुंजाळ यांची सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन च्या Governing Council मध्ये नियुक्ती झाली. ही नियुक्ति 3 वर्षाकरिता असून, पेन मेडिसिन ह्या विषयाबद्दल जास्तीत जास्त जनजागृति करण्याचा मानस असल्याचे डॉ. गुंजाळ यांनी सांगितले. नुकत्याच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदे मध्ये डॉ. विशाल गुंजाळ यांनी Cancer वरील वेदना तसेच चेहर्या वरील वेदना व मॅनेजमेंट यावर मार्गदर्शन केले. या परिषदेत भारतातील तसेच अन्तरराष्ट्रीय सुमारे 500 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. डॉ. विशाल गुंजाळ सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष असून विविध सामाजिक व वैद्यकिय उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या ह्या निवडीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच मराठा विद्याप्रसारक समाज , सार्वजनिक वाचनालय, नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट अकॅडमी च्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





