‘महा-आरएसएसडीआय २०२४’ परिषद शनिवारपासून ; 600 मधुमेह तज्ज्ञांचा सहभाग

Feb 15, 2024

नाशिक- रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया यांच्या वतीने महा-आरएसएसडीआय २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील परीषदेचे नाशिकमध्ये आयोजन केले आहे. ही १८ वी वार्षिक परीषद येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सुला येथे पार पडणार असून, या परीषदेस देशभरातील ६०० मधुमेह तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नारायण देवगांवकर यांनी दिली.
रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडियाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्षपद डॉ.नारायण देवगांवकर यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही परीषद पार पडते आहे. या दोन दिवसीय परीषदेविषयीची माहिती देतांना डॉ.देवगांवकर म्हणाले, 80 हून अधिक दिग्गज तज्ज्ञ मान्यवर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. १७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ पार पडेल. यावेळी महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी उपस्थित राहातील.
या दोन दिवसीय परीषदेत विविध विषयांवर चर्चा घडविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने टाईप-१ डायबेटिसवरील उपचारातील आधुनिकता, युवा पिढीमध्ये आढळणारा मधुमेहःजागतिक आव्हान, इन्सुलिनसंदर्भातील विविध विषय, औषधोपचारातील आधुनिक तंत्रज्ञान, मधुमेहामुळे श्रवण क्षमता घटणे, मधुमेहातील आहार, टाइप २ मधुमेहाची सद्यःस्थिती यांसह सध्याच्या काळाला सुसंगत असे मधुमेहाच्या उपचारात चॅटजिपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग, कृत्रिम गोड (आर्टिफिशियल स्विटनर्स)ः किती सुरक्षित अशा विविध विषयांवर मंथन केले जाणार आहे.
या परीषदेसाठी मार्गदर्शक म्हणून डॉ.विजय पनीकर, डॉ.शशांक जोशी, डॉ.संजीव इंदूरकर, परीषद आयोजन समितीचे सह-अध्यक्ष डॉ.समीर शाहा, आयोजन समिती सचिव डॉ.समीर चंद्रात्रे, सहसचिव डॉ.समीर पेखळे, डॉ.रमेश पवार, सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ.यशपाल गोगटे, सहअध्यक्ष डॉ.मनोज चितळे, खजिनदार डॉ.राहुल पाटील, सहखजिनदार डॉ.विजय धोंडगे, सहखजिनदार डॉ.किरण बिरारी, समन्वयक डॉ.सुवर्णा तांबडे, डॉ.मृणालीनी केळकर हे जबाबदारी सांभाळत आहेत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News