महिलांनी मणके विकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक : डॉ. विशाल गुंजाळ

Feb 16, 2024

नाशिक : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मणक्याचे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात. साठीनंतर मणक्याचे अनेक प्रकारचे आजार होत असले, तरीही ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’ हा त्यातील महत्त्वाचा आजार. या आजारामुळे जी लक्षणे दिसतात त्याला ’न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन’ म्हणतात. साइटिका सारखे लक्षणेदेखील तसेच कंबर दुखणे, चालताना मांड्या, पोटर्‍या भरून येणे, जड पडणे, बधीर होणे, मुंग्या येणे सुरू होते. काही दिवसांनंतर केवळ उभे राहिले तरी मांड्या व पाय भरून येतात. आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास लघवीवरचे नियंत्रण जाणे आणि पायातील स्नायूंची ताकद कमी होणे याची देखील शक्यता असते.त्यासाठी महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिक पेन क्लिनिक सेंटरचे मणकेविकार व वेदनातज्ञ डॉ. विशाल गुंजाळ यांनी केले.
लोकज्योती महिला मंडळात आयोजित व्याख्यानात डॉ. गुंजाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा कुमुदिनी कुलकर्णी, उल्का कुरणे, वैशाली पिंगळे, सविता चतुर, कमला पणेर, शिला राजपूत उपस्थित होत्या.
डॉ. गुंजाळ म्हणाले की, मणकेविकार टाळायचे असल्यास विविध व्यायाम, जीवन शैली बदलने, आहारावर नियंत्रण, वजन कमी करणे, योग्य निदान व वेळेवर योग्य उपचार केल्यास बहुसंख्य रूग्णांना ऑपरेशनची गरज लागत नाही. अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान व संशोधनामुळे इंजक्ेशन व औषधोपचारामुळेही मणकेविकाराचा त्रास टाळता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे कुठलेही दुखणे अंगावर काढण्याऐवजी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महीला मंडळातर्फे सभासंदासाठी हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्का कुरणे यांनी केले तर सूत्रसंचालन मंजुषा पहाडे, आभार सविता चतुर यांनी केले. यासाठी जया खोडे, अनिता जस्ते, जयश्री राणे, कुमुदिनी पाटिल तसेच संचालक व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News