मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा हे ठरले अॅमेझॉनच्या प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते

Feb 16, 2024

नाशिक : अॅमेझॉन इंडियाने आज अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर (प्रोपेल अॅक्सीलरेटर) सीझन ३ चे विजेते म्हणून मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा यांच्या नावाची घोषणा केली. विजेत्यांना अॅमेझॉन कडून एकत्रितपणे अनुदानात ८३ लाख रुपये मिळाले. मिराना टॉईज अॅप नियंत्रित ऑगमेंटेड रिअॅलिटी गेम्स द्वारे डिजिटल आणि फिजिकल खेळाचे मिश्रण केले असून नाविन्यपूर्ण स्मार्ट खेळण्यांची श्रेणी ते सादर करतात. एव्हीमी हर्बलची स्थापना ८५ वर्षीय राधा कृष्ण चौधरी उर्फ नानाजी यांनी केली. आपल्या रोजच्या दिवसाच्या केसांविषयक समस्यांसाठी प्रभावी, शतकापासून चालत आलेल्या आयुर्वेदावर आधारित केसांची निगा ठेवणारा हा ब्रॅंड आहे. पर्फोराचे उद्दिष्ट स्वच्छ घटक आणि चांगल्या डिझाईनसह दररोजची मौखिक निगा उंचावणे हे आहे. हा भारताचा पहिला प्रमाणित ओरल हेल्थ ब्रॅंड असून “ १टक्के फॉर द प्लॅनेट” कम्युनिटीचा सदस्य आहे.

प्रोपेल अॅक्सीलरेटर सीझन ३ व्हेंचर कॅपिटल फर्म अॅक्सेल, अॅमेझॉन संभव व्हेंचर फंड, डीएसजी कंन्झ्यूमर पार्टनर्स, फायरसाइड व्हेंचर्स, पीक एक्सवी , वी३ व्हेंचर्स तसेच क्लब आणि व्हेलॉसिटी सह महसूल आधारित वित्तीय फर्म यांसह मार्च २०२३ मध्ये सादर झाले. तिसऱ्या सीझनला भारतातील १४० शहरांमधून स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख ब्रँड्सद्वारे १२०० हून अधिक अर्जासह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. जिवा , मोकाबरा , ओपन सिक्रेट आणि इतर ब्रँड्ससह ४७ स्टार्टअप्सची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. विजेत्यांना आणि सर्व अंतिम स्पर्धकांना एडब्ल्यूएस सक्रिय क्रेडिट्समध्ये एक दशलक्ष (संचयी) डॉलर देखील मिळाले.

कार्यक्रमात ८ आठवड्याचा अॅक्सीलरेटर समाविष्ट होता ज्याचा भाग म्हणून भारतातील अॅमेझॉन लिडर्स, विसी भागीदार आणि इतर विशिष्ट उद्दिष्ट धारित कार्यशाळेद्वारे अंतिम स्पर्धकांसोबत सहभागी झाले. जागतिक मागणीच्या पद्धतींवर १:१ मार्गदर्शन केले आणि ई-कॉमर्स द्वारे यशस्वी निर्यात व्यवसाय तयार करण्यासाठीची माहिती दिली. शेवटी, बहुविद्याशाखीय पॅनेलद्वारे निवडलेल्या १० अंतिम स्पर्धकांना फायरसाइड व्हेंचर्स कडून प्रयाग मोहंती, पीक एक्सव्ही कडून श्रेयांश ठाकूर, अॅमेझॉन संभव व्हेंचर फंड कडून प्रीतम एन, डीएसजी कंन्झ्यूमर पार्टनर्स कडून पूजा शिराली आणि वि३ व्हेंचर्सकडून अभिराम भालेराव या प्रतिष्ठित ज्युरीसमोर सादरीकरणाची संधी मिळाली. परीक्षकांनी व्यवसायाची कल्पना आणि गाभा, प्रोडक्ट मार्केट फिट, पिच बाजारपेठेतील बिझनेस मेट्रिक्स आणि जागतिक विस्तार योजना यासह विविध मापदंडावरून मूल्यांकन केले. परीक्षकांनी मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा यांना प्रोपेल अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते म्हणून घोषित केले

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News