आयव्‍हीयुएस/एफएफआर तंत्रज्ञानाने नाईन पर्ल्स हॉस्पिटल सुसज्ज

Mar 16, 2024

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अँजिओप्लास्टी करत हॉस्‍पिटलची आधुनिकतेकडे वाटचाल

नाशिक- अल्पवधीतच नाशिक व उत्तर महाराष्ट्रात नावलौकिक मिळालेले नाईन पर्ल्स हॉस्पिटल हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. यासोबत सर्वात मोठी कार्डियाक विभागाची तज्ञ डॉक्टर्सची टीम, अत्याधुनिक व सुस्सज शीमाडज्यु जापनीज कंपनीची फ्लॅटपॅनल कॅथलॅब या हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध आहे. आणखी एक पाऊल पुढे टाकतांना नाईन पर्ल्स हॉस्‍पिटल हे आयव्‍हीयुएस/एफएफआर तंत्रज्ञानाने सुसज्‍ज झाले असून, या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अँजिओप्लास्टी करत हॉस्‍पिटलची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु ठेवली आहे.

हॉस्‍पिटलच्‍या या कामगिरीविषयीची माहिती पत्रकार परीषदेच्‍या माध्यमातून देण्यात आली. यावेळी नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे सर्व संचालक डॉ. शीतलकुमार हिरण, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. नागेश अघोर, डॉ. दिनेश वाघ, डॉ. धनंजय डुबेरकर, डॉ. विनायक शेणगे, डॉ. योगेश चौधरी, डॉ. हुसेन बोहरी, हॉस्पिटल केंद्र प्रमुख जॉन प्रिजू हे उपस्थित होते.
हृदयच्या आजाराचे वाढते प्रमाण बघता त्यात गुंतागुंतीच्या हृदयविकार आजकल वाढतच चालले आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. म्‍हणून नाईन पर्ल्स हॉस्पिटल येथे हृदयरोग विभागाचे तज्ञ डॉक्टर्स यांनी आयव्‍हीयुएस/एफएफआर तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. नुकतेच निघालेले आयव्‍हीयुएस तंत्रज्ञान सध्या प्रचलित असून या तंत्रज्ञानाव्दारे प्रत्यक्षात ज्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस असतात, तेथील दृश्य दिसते. व त्यावर योग्य ती उपचार प्रणाली वापरुन केलेली अँजिओप्लास्टी अधिक परीणामकारक ठरते. अशा स्‍वरुपाचे आधुनिक तंत्रज्ञान आत्तापर्यंत केवळ मोठ्या शहरांमध्ये उपलब्‍ध होते. परंतु आता नाईन पर्ल्स हॉस्‍पिटलने नाशिकच्‍या स्‍तरावर ही सुविधा उपलब्‍ध करुन दिली आहे.
आयव्हस गायडेड अँजिओप्लास्टी या पध्दतीत हृदयाच्या धमण्यांच्या आतमधील सोनोग्राफी करुन ब्लॉकेजेसचे अचूक निदान केले जाते. यानंतर स्टेन्ट योग्यरित्या टाकून त्याचे व्यवस्थितरित्या रोपण केले जाते. कटिंग बलून या विशिष्ट प्रकारच्‍या बलूनवर ब्लॉकेज तोडण्यासाठी स्पेशालाईज दाते असतात. ते धमण्यांमध्ये असलेले ब्लॉकजचे कैल्शियम पूर्णपणे तोडून वेगळे करतात. अत्याधुनिक अँजिओप्लास्टी पध्दतींच्या यादीत ओपीएन बलून (ओव्हर प्रेशर बलून), इंट्रा व्हॅस्कुलर लिथो ट्रिपसी लेझर गाईडेड पद्धतीद्वारे धमण्यांमधील कॅल्शियम तोडणे शक्‍य बनले आहे. अशा विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन अँजिओप्लास्टी केली जाऊ शकते.
आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या वापरातून केलेल्‍या अँजीजिओप्लास्टी थोड्या खर्चिक असतात. परंतु हृदयाची प्रकृती व कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी काही वेळेस अशा प्रकारच्या पध्दतींचा वापर करावा लागतो. या शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या रुग्णांना कराव्या लागतात असेही नाही. विदेशात हे तंत्रज्ञान प्रत्येक अँजिओप्लास्टीसाठी वापरले जाते. आपल्याकडे खूप कॅल्सिफाईड आणि जटिल ब्लॉकेजेससाठी किंवा इन्स्टेट रीस्टेनोसिस (स्टेंटमध्ये आलेला ब्लॉकज) अशा प्रकारच्या रुग्णांना या उपचार पध्दतींचा उपयोग करून अँजिओप्लास्टी केल्यास फार चांगले परीणाम मिळतात.

फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह (एफएफआर) तंत्रज्ञानाचा वापर आता रुग्णावर अँजिओप्लास्टी/ बायपास सर्जरी करणे आवश्यक आहे की नाही हे तपासण्यासाठी केला जातो. ब्लॉकमुळे समस्या निर्माण होतील की नाही आणि ब्लॉक केलेल्या धमनीची अँजिओप्लास्टी फायदेशीर ठरेल की नाही हे ठरवण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह हा एक नवीन अत्याधुनिक शोध आहे. यामध्ये मार्गदर्शक वायर-आधारित प्रक्रियेचा वापर केला जातो. ज्यामुळे रक्तदाब अचूकपणे मोजता येतो. तसेच नेमक्‍या कुठल्‍या भागात रक्‍ताच्‍या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे, याचे निदान करणे सुलभ होते. फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्हचे मोजमाप ब्लॉकेजेसवर अँजिओप्लास्टी किंवा स्टेंटिंग करायचे की नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. उदाहरण द्यायचे झाल्‍यास जर एफएफआर मूल्य ०.८० पेक्षा जास्त असेल, तर अवरोधित धमनीवर केवळ औषधोपचाराने उपचार केले जाऊ शकतात.

नाईन पर्ल्स हॉस्पिटलच्या कार्डियाक विभागाची कामगिरी बघता, गेल्या २ वर्षात २५०० अधिक हृदयासंबधी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
त्यात ५५० हून अधिक अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्या आहेत. येणाऱ्या काळात या तंत्रज्ञाचा फायदा अधिकाधिक रुग्‍णांना होईल, असा विश्‍वास उपस्‍थित सर्व संचालक डॉक्‍टरांनी व्‍यक्‍त केला.

 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News