बालकांच्‍या दुर्मिळ, क्‍लिष्ट आजारांवर लोकमान्‍य हॉस्‍पिटलमध्ये यशस्‍वी उपचार

Mar 25, 2024

डॉक्‍टरांच्‍या कौशल्‍यांमुळे 3 बालकांना मिळाले नवजीवन

नाशिक- गेल्‍या काही वर्षांमध्ये शहरातील वैद्यकीय क्षेत्राची प्रचंड प्रगती झाली असली तरी अजून काही क्षेत्रात वैद्यकीय उपचार नाशिकमध्ये उपलब्‍ध होऊ शकलेले नाहीत. त्‍यामुळे रुग्‍णांना पुणे किंवा मुंबईच गाठावे लागते. लहान बालकांच्‍या हृदय शस्‍त्रक्रिया हा यापैकीच एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु लोकमान्‍य हॉस्‍पिटल, नाशिक येथील डॉक्‍टरांनी आपल्‍या कौशल्‍यांचा वापर करतांना गेल्‍या ३ महिन्‍यांमध्ये गुंतागुंत व क्‍लिष्ट आजार असलेल्‍या तीन बालकांवर यशस्‍वी उपचार केले आहेत. त्‍यामुळे बालकांना नवजीवन मिळाले आहे.

२०२१ मध्ये नाशिकमधील लोकमान्‍य हॉस्‍पिटलमध्ये हृदयरोगशस्‍त्रक्रिया दालन सुरु झाले. येथे हृदयरोग तज्‍ज्ञ डॉ.नीलेश पुरकर, डॉ. नितीन ठाकरे, डॉ.अभयसिंग वालिया, लहान मुलांचे हृदयरोग तज्‍ज्ञ डॉ ललित लवनकर यांसारखे हृदयशस्‍त्रक्रिया तज्‍ज्ञ हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध झाले. या डॉक्‍टरांनी बालकांवरील हृदयशस्‍त्रक्रिया करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. गेल्‍या तीन महिन्‍यांमध्ये अवघड अशा तीन शस्‍त्रक्रिया नुकताच लोकमान्‍य हॉस्‍पिटल येथे यशस्‍वीरित्‍या पार पडल्या.
पहिल्‍या घटनेत इगतपुरी तालुक्‍यातील पाड्यावरील कार्तिकला ‘टेट्रालाजी ऑफ फेलो’ या हृदयाच्‍या आजाराने ग्रासलेले होते. यामध्ये एकाचवेळी हृदयामध्ये चार गुंतागुंतीचे बदल झालेले असतात. त्‍याचे प्‍लेटलेट सुद्धा ३० हजारापेक्षा कमी होते. त्‍यामुळे मुंबईच्‍या नामांकित हॉस्‍पिटलने शस्‍त्रक्रियेला नकार दिला होता. अशा वेळी डॉ. दत्ता देवकाते यांनी रुग्‍णाला लोकमान्‍य हॉस्‍पिटलमध्ये आणले. लोकमान्‍य हॉस्‍पिटलमध्ये त्‍याच्‍यावर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया व उपचार केले. आज कार्तिक हसत खेळत सामान्‍य बालकांप्रमाणे जीवन जगतो आहे.

दुसऱ्या घटनेत नाशिकमधील अमरीन अत्तार या १२ वर्षांच्‍या बालरुग्‍णाला ‘टोटल ॲनोमॅलस पल्‍मनरी व्‍हिनस कनेक्‍शन’ या हृदयाच्‍या गंभिर आजाराचे निदान झाले. हॉस्‍पिटलमध्ये डॉ.पुरकर, डॉ.ठाकरे व डॉ.वालिया या तिन्‍ही शल्‍यचिकित्‍सकांनी संयुक्‍त प्रयत्‍नांतून तिच्‍यावर यशस्‍वी उपचार केले. आज अमरीन स्‍वस्‍थ जीवन जगत आहे.

तिसऱ्या घटनेत जुनेरा शेख या ३ महिन्‍यांच्‍या व ४ किलो वजनाच्‍या मुलीला जन्‍मजात ‘टीएपीव्‍हीसी’ आजार होता. ४ किलो वजन आणि आजाराची क्‍लिष्टतेमुळे डॉक्‍टरांनी तिला मुंबईला हलविण्याचा सल्‍ला दिला. पण आईने डॉक्‍टरांवर संपूर्ण विश्‍वास व्‍यक्‍त करतांना, आम्‍ही कुठेही जाणार नसून लोकमान्‍य हॉस्‍पिटलमध्येच उपचार करावे अशी विनंती केली. त्‍यांची विनंती विनम्रतेने स्‍वीकारतांना डॉक्‍टरांनी शस्‍त्रक्रियेची तयारी केली. त्‍यासाठी आवश्‍यक अनेक यंत्रसामग्री मागविली. व शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडली. चौथ्या दिवशी मुलीला आईच्‍या हाती सोपवतांना हॉस्‍पिटल कर्मचार्यांचे उर भरुन आले होते. शल्‍यचिकित्‍सकांसोबतच लोकमान्‍य हॉस्‍पिटलमध्ये कार्यरत भुलतज्‍ज्ञ डॉ.नंदा सिन्‍हा, संजीवनी शास्त्र डॉ.मनोज सुर्वे, सहाय्यक शुभम कस्‍तुरे, संदेश घाटगे, साक्षी वाल्‍टे, पवन मेधणे, शिल्‍पा शेंडे आदींचे मोलाचे सहकार्य मिळाले.

सामाजिक संस्‍थांकडून मिळाली अर्थसहाय्यता
या तिन्‍ही शस्‍त्रक्रियांसाठी लागणारा खर्च अमाप होता. शासनाकडून मिळणारे जीवनदायी योजनेचे पैसे तोकडे पडत असल्‍याने खर्च व अनुदान यांचा ताळमेळ बसत नव्‍हता. अशा वेळी ‘दिल दोस्‍ती फाऊंडेशन’ आणि ‘स्‍वदेस फाउंडेशन’ या संस्‍था हॉस्‍पिटलच्‍या मदतीस आल्‍या. आणि त्‍यांनी उपचारार्थ हॉस्‍पिटलला काही निधी उभारुन दिला. बालकांमध्ये असलेले हृदयरोग ही देशासाठी असलेली गंभीर समस्‍या आहे. आणि त्‍याच्‍यावर लागणारे उपचार करण्याचे शिवधनुष्य लोकमान्‍य हॉस्‍पिटल उचलू पाहत आहे. त्‍याबद्दल वैद्यकीय क्षेत्रासह समाजाच्‍या वेगवेगळ्या स्‍तरावरुन त्‍यांचे कौतुक होते आहे. अधिकाधिक रुग्‍णांनी या आरोग्‍य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्‍य हॉस्‍पिटलचे संचालक डॉ.राजेंद्र बोरसे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News