Nashik : आदिवासी सेवा समिती संचलित प.पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथील शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक जाधव डी. एम. याच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हातात झाडाच्या कुंड्या घेऊन ” झाडे लावा, झाडे जगवा “माणसा माणसा काव काव, एक तरी झाड लाव “आदि घोषणा देत गावातून पर्यावरण संदर्भात जनजागृती करण्यात आली या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपारिक वेषभूषा परिधान केली होती. शाळेचे जेष्ठ शिक्षक संजय ठोके यांनी हवामानात बदल संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील शिक्षक पवार. पी. व्ही, देवरे ए. एम.तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




