Nashik : बागलाण तालुक्यातील मळगांव (ति) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कै.सौ.कासुबाई दावल ठोके फाऊंडेशन कळवणचे संस्थापक अध्यक्ष, संजय ठोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीने ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली. सरपंच योगेश ठोके यांच्या अध्यक्षतेखालील व निवडणूक अधिकारी ग्रामसेवक सौ. वैशाली पवार यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. संजय ठोके यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्याची बिनविरोध निवड झाली. सदस्य संगीता ठोके, सागर पवार, स्वपनाली पिंपळसे, रविंद्र पवार, सोनाली मगरे, पार्वताबाई पिंपळसे, तसेच दिपक ठोके, दिपक गांगुर्डे, योगेश पिंपळसे, रविंद्र ठोके, भूषण जाधव, आदि ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते यावेळी जि. प शाळेतील विद्यार्थ्यांना झाडांची रोपे लागवडीसाठी देण्यात आली
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






