हृदयविकार तज्‍ज्ञांच्‍या तीन दिवसीय परीषदेचे नाशिकमध्ये आयोजन

Aug 29, 2024

वेगवेगळ्या सत्रांतून सहभागी हृदयविकार तज्‍ज्ञांना मिळणार मार्गदर्शन

नाशिक– कार्डियालॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्‍या महाराष्ट्र राज्‍य शाखेच्‍या वतीने मिड टर्म इंटरव्‍हेंशनल एमआयसी मीट या राज्‍य स्‍तरावरील परीषदेचे आयोजन नाशिक शहरात केले आहे. येत्‍या ३०, ३१ ऑगस्‍ट आणि १ सप्‍टेंबर असे ३ दिवस ही परीषद हॉटेल रॅडिसन्‍स ब्‍ल्‍यू या ठिकाणी पार पडणार आहे, अशी माहिती परीषदेच्‍या आयोजन समितीचे मुख्य सचिव डॉ.मनोज चोपडा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी दिली आहे.
अधिक माहिती देतांना डॉ.मनोज चोपडा म्‍हणाले, नाशिकच्‍या स्‍तरावर हृदयाच्‍या अनेक गुंतागुंतीच्‍या व क्‍लिष्ट शस्‍त्रक्रिया यशस्‍वी करताना अनेक विक्रम प्रस्‍थापित झालेले आहेत. नाशिकसह राज्‍यभरातील व देशभरातील हृदयविकार तज्‍ज्ञांना मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्‍या या परीषदेनिमित्त नाशिकच्‍या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. परीषदेमध्ये वेगवेगळ्या वयोगटात हृदयविकारात उद्‌भवणारी गुंतागुंत, कॅल्‍शीयमचे व्‍यवस्‍थापन, टावी, स्‍टेमी, सीटीओ आदी विषयांवर तज्‍ज्ञ मार्गदर्शकांची चर्चा घडविली जाणार असून, यात ६ इंटरव्‍हेंशनल प्रत्‍यक्ष प्रात्‍येक्षिके डेनमार्क, इटली, व अमेरीका येथून स्‍टेंटलेस स्‍ट्रॅटेजी, टावी, मायट्राक्‍लिप, ऑर्बिटल ऑरथ्रेटटॉमी या शस्‍त्रक्रियांचे प्रात्‍येक्षिक परीषदेतलील सहभागी डॉक्‍टरांना दाखविले जाणार आहेत.
या परीषदेत सहभागासाठी एकूण ४८० हृदयविकार तज्‍ज्ञांनी नोंदणी केली आहे. परीषदेमध्ये ५ आंतरराष्ट्रीय केसेसचे सादरीकरण होणार आहे. तर सहभागी डॉक्‍टरांना मार्गदर्शन करणार्या तज्‍ज्ञ हृदयविकार तज्‍ज्ञांमध्ये ६ आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील तज्‍ज्ञ, ३० राष्ट्रीय स्‍तरावरील तज्‍ज्ञ आणि ७० राज्‍यस्‍तरावरील तज्‍ज्ञ मान्‍यवर सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत. परीषदेत सादरीकरणासाठी १५० शोधप्रबंधांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये राज्‍यभरातील १५० हृदयविकार तज्‍ज्ञ त्‍यांचे शोधप्रबंध व त्‍यांना आलेले अनुभव सहभागींसमोर विशद करणार आहेत. इंटरव्‍हेंशनल कार्डियालॉजीसंबंधीची ही महाराष्ट्रातील पहिली परीषद आहे.
कार्डियालॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही हृदयविकार तज्‍ज्ञांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे. दरवर्षी या असोसिएशनतर्फे सदस्‍य डॉक्‍टरांसाठी मार्गदर्शनावर आधारित परीषदेचे आयोजन केले होते. यावर्षी महाराष्ट्र शाखेच्‍या नेतृत्‍वाखाली ही परीषद आयोजित करण्याचा बहुमान नाशिकला मिळाला आहे. परीषदेच्‍या नियोजनासाठी विविध समित्‍यांची स्‍थापना केलेली आहे.
सीएसआय महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डा. विजय बंग, सचिव डॉ.आशिष देशपांडे, उपाध्यक्ष डॉ.सतीश रोपलेकर, डॉ.दर्शन झाला, सहसचिव डॉ.पंकज हिरकूड खजिनदार डॉ.राजकुमार घुमरे, सहाय्यक सचिव डॉ.मुकुंद बजाज यांची उपस्‍थिती असेल. ३ दिवस चालणार्या या परीषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर सत्रांचे, समुह चर्चेचे आयोजन केले आहे. ही परीषदेचा नाशिक शहर व जिल्‍ह्‍यातील हृदयविकार तज्‍ज्ञांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, त्‍यांनी प्राप्त केलेल्‍या ज्ञानाचा उपयोग रुग्‍णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी होणार आहे. परीषदेनिमित्त विविध शहरांतून येणारे डॉक्‍टर शहरातील वेगवेगळ्या पर्यटनस्‍थळांना भेटी देणार असून, यामुळे स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेला बळ मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News