एचसीजी मानवता कन्‍सर सेंटर बनले नाशिकचे पहिले एनएबीएच डिजिटल हेल्‍थ स्‍टॅर्डड्‌स ॲक्रिडिएटेड हॉस्‍पिटल

Sep 24, 2024

नाशिक– एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर (एचसीजीएमसीसी) हे नाशिकमधील आघाडीचे कॅन्‍सर स्‍पेशालिटी हॉस्‍पिटल आहे. या हॉस्‍पिटलने नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्‍पिटल्स ॲण्ड हेल्‍थकेअर प्रोव्‍हायडर्स (एनएबीएच) यांचे डिजिटल हेल्‍थ स्‍टॅण्डर्डस्‌करिता प्रतिष्ठेचे असे सिल्व्‍हर लेव्‍हलचे मानांकन मिळालेले आहे. अशा स्‍वरुपाचे महत्त्वपूर्ण मानांकन मिळविणारे एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर हे नाशिकमधील पहिले रुग्‍णालय ठरला असल्‍याची माहिती व्‍यवस्‍थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी अॅण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.
आरोग्‍य सुविधा पुरवितांना रुग्‍णांच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्टीकोनातून अत्‍याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर कशा पद्धतीने केला जातो, याचे मुल्‍यमापन एनएबीएच डिजिटल हेल्‍थ स्‍टॅण्डर्डस्‌च्‍या माध्यमातून केले जाते. निश्‍चित केलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वांतून हॉस्‍पिटलला त्‍यांच्‍या डिजिटल क्षमता वाढीसाठी प्रोत्‍साहन मिळते. तसेच आरोग्‍य क्षेत्रात होत असलेल्‍या डिजिटल क्रांतीसाठी हॉस्‍पिटलला परीपूर्ण बनविते.
अधिक माहिती देतांना एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर (एचसीजीएमसीसी) चे एमडी व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस डॉ. राज नगरकर म्‍हणाले, हॉस्‍पिटलला एनएबीएच डिजिटल हेल्‍थ स्‍टँडर्डस्‌चे सिल्‍व्‍हर मानांकनने सन्‍मानित करण्यात आल्‍याची अभिमानास्‍पद बाब आहे. झपाट्याने बदलत असलेल्‍या आरोग्‍य सेवेच्‍या क्षेत्रात तंत्रज्ञानातील आधुनिकता रुग्‍णांवरील उपचार व सुरक्षिततेत अत्‍यंत महत्‍वाची भूमिका बजावत आहे. वाढत असलेली लोकसंख्या आणि आरोग्‍य सेवेची वाढती मागणी लक्षात घेता, डिजिटल हेल्‍थकेअर उपाययोजना पुरविणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक बनत चालले आहे. ‘एचसीजीएमसीसी’ येथे आम्‍ही सातत्‍याने नवनीवन तंत्रज्ञान अवगत करतांना परिणामकारकता, अचुकता वाढवत रुग्‍णांना दिलासा देण्यासाठी आम्‍ही सदैव कटिबद्ध आहोत.
नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्‍पिटल्स ॲण्ड हेल्‍थकेअर प्रोव्‍हायडर्स (एनएबीएच) चे डिजिटल हेल्‍थ स्‍टँडर्डस्‌करिता सिल्व्‍हर मानांकन मिळविणारे महाराष्ट्रात खुप कमी रुग्‍णालये आहेत. प्रामुख्याने नमुद करायचे झाल्‍यास उत्तर महाराष्ट्राच्‍या स्‍तरावर एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर यांनी हे मानाचे मानांकन प्राप्त करतांना आरोग्‍य सुविधेतील त्‍यांचा दर्जा अधोरेखीत केला आहे.
या यशस्‍वी कामगिरीतून हॉस्‍प्‍टिलच्‍या माध्यमातून सर्वोत्तम आरोग्‍य सेवा पुरविण्याचे धेय्य आणि गुणवत्ता वाढवत नेण्याचा ध्यास दिसून येतो. हॉस्‍पिटलची ही कामगिरी उत्तर महाराष्ट्राच्‍या स्‍तरावर आरोग्‍य सेवेच्‍या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे. व यासोबत समाजात दर्जेदार आरोग्‍यसेवा पुरविण्यासाठी प्रोत्‍साहनात्‍मकदेखील ठरणार आहे.

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर (एचसीजीएमसीसी) विषयी-
डॉ. राज नगरकर यांनी २००७ साली नाशिक येथे एचसीजीएमसीसीची स्‍थापना केली. हे हॉस्‍पिटल भारतातील पहिले एनएबीएच मानांकन प्राप्त रुग्‍णालय आहे. कर्करोगावर सर्वसमावेशक उपचार प्रदान करतांना ५० कन्‍सल्‍टंट कॉन्‍कॉलॉजीस्‍ट ९०० कर्मचारी आणि २७५ बेड्‌सची क्षमता असलेले एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर हे राष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त केला आहे. शस्‍त्रक्रिया, रेडिएशन, मेडिकल ऑन्‍कॉलॉजी या शाखांमध्ये सेंटरने विशेष प्राविण्य मिळविले असून, येथे ६५,००० पेक्षा जास्‍त शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या आहेत. गौरवास्‍पद बाब म्‍हणजे यामध्ये १,१०० पेक्षा जास्‍त रोबोटिक असिस्‍टेड शस्‍त्रक्रिया आहेत. रुग्‍ण केंद्रित व सर्वसमावेशक दृष्टीकोन बाळगतांना एचसीजीएमसीसी यांच्‍या माध्यमातून प्रत्‍येक रुग्‍णाला त्‍यांच्‍या गरजा लक्षात घेत सर्वोत्‍कृष्ट उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे. आरोग्‍य सेवेतील प्राविण्य मिळवितांना सेंटरतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासतांना समाजातील सर्व घटकांना दर्जेदार उपचार पद्धती उपलब्‍ध करुन देण्याचे परिश्रम देशाला कर्करोग मुक्‍तीच्‍या दिशेने नेण्यात महत्त्वाची कामगिरी बजावत आहे.

अजून बातम्या वाचा..

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
Breaking News