हृदयविकारांच्या संकट काळात नक्की काय प्रथमोपचार केला पाहिजे ; उपचारांबाबत तीन दिवसीय उपक्रमाचे मंथन विजन हॉस्‍पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्‍या वतीने आयोजन

Sep 27, 2024

नाशिक- हृदयविकारांवर अनेक आधुनिक उपचार उपलब्‍ध झालेले आहे. यासंदर्भात चर्चा घडविण्यासाठी कॉलेजरोडवरील विजन हॉस्‍पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्‍या वतीने तीन दिवसीय उपक्रमाचे आयोजन केले आहे. २८ ते ३० सप्‍टेंबर यादरम्‍यान होणार्या या उपक्रमामध्ये कार्यशाळा, संवाद सत्र, परीषद, गटचर्चांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून दिग्‍गज तज्‍ज्ञ सहभागी डॉक्‍टरांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रसिद्ध हृदयविकार तज्‍ज्ञ व हॉस्‍पिटलचे प्रमुख डॉ.विनोद विजन यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे. उपक्रमांतर्गत विजन हॉस्‍पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्‍या वतीने ‘कार्डियाक इंटरव्‍हेंशन्‍स’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा होणार आहे. २८ सप्‍टेंबरला सकाळी ११ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत असे दिवसभर कॉलेजरोडवरील विजन हॉस्‍पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथील कॅथलॅब येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे. यावेळी तज्‍ज्ञ मान्‍यवर ॲन्‍जिओप्‍लास्‍टीविषयी मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेमध्ये मुंबई येथील डॉ.निमित शाह, नाशिकचे डॉ.विक्रांत विजन, डॉ.विनोद विजन मार्गदर्शन करणार आहेत.

सुलामधील सत्रात पाचशे डॉक्‍टरांचा सहाभाग
२९ सप्‍टेंबरला जागतिक हृदय दिनानिमित्त सुला विनियार्डस्‌मध्ये दिवसभर विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे. यावेळी ५०० पेक्षा जास्‍त सदस्‍य डॉक्‍टर सहभागी होणार आहेत. सकाळी नऊ वाजेपासून सत्रांना सुरुवात होईल. यावेळी कार्डियाक अल्‍ट्रॉसाउंड या विषयावर ठाणे झुपिटर हॉस्‍पिटलचे डॉ.ऋषिकेश शाह मार्गदर्शन करणार आहेत. हार्ट फेल्‍युअरवरील उपचार याविषयी डॉ.विक्रांत विजन मार्गदर्शन करतील. यानंतरच्‍या सत्रांमध्ये हृदयविकार टाळण्यासाठीच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांची माहिती डॉ.विनोद विजन देणार आहेत. तसेच डॉ.निमित शाह (मुंबई), डॉ.रमण पुरी (नवी दिल्‍ली) यांचे मार्गदर्शन सत्र होतील. तसेच गट चर्चेतून डॉ.विक्रांत विजन, डॉ.गुलशल तोलानी, डॉ.श्रीष्टी विजन, डॉ.विनोद विजन मार्गदर्शन करतील.
३० सप्‍टेंबरला महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ येथे परीषद होणार आहे. या परीषदेमध्ये डॉ.रमण पुरी (नवी दिल्‍ली), डॉ.विनोद विजन यांच्यासह डॉ.विक्रांत विजन, डॉ.गुलशन तोलानी, डॉ.अब्‍दुल राउफ, डॉ.श्रीष्टी विजन मार्गदर्शन करतील. लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स यांच्‍या सहकार्याने ही परीषद होणार आहे.

डॉ.विजन यांच्‍या नेतृत्‍वाखाली परीषद
कार्डिओ व्‍हेस्‍क्‍युलर सोसायटी नाशिक (सीव्‍हीएसएन) चे संस्‍थापक अध्यक्ष तथा विद्यमान अध्यक्ष डॉ. विनोद विजन, आणि संस्‍थापक सचिव तथा विद्यमान सचिव डॉ.विक्रांत विजन यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही परीषद होते आहे. कॉलेजरोडवरील विजन हॉस्‍पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्‍या माध्यमातून आजवर हजारो रुग्‍णांवर यशस्‍वी उपचार करतांना त्‍यांच्‍या जीवनात परीवर्तन घडविला आहे. आता या परीषदेच्‍या माध्यमातून डॉक्‍टरांना मार्गदर्शन उपलब्‍ध केले जाणार असल्‍याने, हॉस्‍पिटलच्‍या कार्याचाही या माध्यमातून विस्‍तार होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News