आरोग्‍य सुविधा पुरविण्यात शालक्‍यांची भूमिका महत्‍वाची डॉ.राजेश पवार

Sep 27, 2024

तीन दिवसांच्या सिनर्जी २०२४ राष्ट्रीय परीषदेला सुरुवात

नाशिकः नेत्र, नाक-कान-घसा, आणि दंतशास्‍त्रातील तज्‍ज्ञ डॉक्‍टर शालक्‍यांनी समाजात आरोग्‍य सेवा पुरवितांना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापुढील काळातही सामाजिक आरोग्‍य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी या तज्‍ज्ञांवर असणार आहे, असे प्रतिपादन दी असोसिएशन ऑफ शालाकी (टीएएस) महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डॉ. राजेश पवार यांनी केले.

दी असोसिएशन ऑफ शालाकी (टीएएस) यांच्‍या पुढाकारातून व राज्‍य शाखेच्‍या वतीने हॉटेल रॅडिसन्‍स ब्‍ल्‍यू येथे ‘सिनर्जी २०२४ः सा विद्या या विमुक्‍तये’ या तीन दिवसीय परीषदेला शुक्रवारी (२७ सप्‍टेंबर) सुरुवात झाली. या परीषदेत सहभागी डॉक्‍टरांन संबोधित करतांना ते बोलत होते. महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र लहोरे, यांच्‍यासह डॉ.दिलीप पुराणिक, डॉ.अमोल देशमुख, डॉ. मयूर लांडे, डॉ. मयुरेश कुलकर्णी, डॉ. तुषार फिरके, डॉ.सुवर्णा गोलेचा, डॉ. संदीप निमसे, डॉ.बाळकृष्ण पाटील, डॉ.संदीप निसाळ, डॉ.प्रवीण चव्हाण, डॉ.वसंत भगली, डॉ.विवेक कानडे, डॉ.दिलीप भुसारी, डॉ.सी. के. वलवनकर, डॉ. विशाल चौधरी, डॉ.अभिजीत आग्रे, डॉ.संदीप निमसे आदी मान्यवर उपस्थित होते. परीषदेचे उद्‌घाटन महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातील आयुर्वेद विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.आवारे यांच्‍या हस्‍ते झाले.
डॉ.पवार म्‍हणाले, मधुमेह, रक्तदाब व वार्धक्य यांमुळे जगपातळीवर अंधत्‍व येण्याचे प्रमाण लक्षणीय असून भारतातही याचे प्रमाण अत्याधिक आहे त्‍यासाठी मिश्र उपचार पद्धतीचा (Integrated Medicine) प्रभावीपणे उपयोग करून अंधत्व कमी करण्यास फायदा होत आहे असे त्‍यांनी सांगितले.
राज्‍य अध्यक्ष डॉ. राजेंद्र लहोरे म्‍हणाले, महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित या १९ व्‍या सिनर्जी २०२४ या परीषदेत ज्ञान अध्यावत करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन केले आहे. तीन दिवसीय परीषदेत पाच वेगवेगळ्या सभागृहांमध्ये नेत्र, कान-नाक-घसा व दंतशास्‍त्रातील विद्यार्थी, शिक्षक व डॉक्‍टर यांचे शोधप्रबंधांचे सादरीकरण होत आहे. तसेच अन्‍य एका सभागृहात हॅण्ड ऑन ट्रेनिंग सुरु आहे. शनिवारी (२८ सप्‍टेंबरल) समुह चर्चेचे आयोजन केले असून, उपचार पद्धतीवर चर्चा घडविली जाणार आहे.
डॉ. अमोल देशमुख म्‍हणाले, परीषदेत एकूण ६० वक्‍त्‍यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भारत भरातून सहभागी झालेल्‍या ६०० पेक्षा जास्‍त डॉक्‍टरांना तज्‍ज्ञ त्‍यांचा अनुभव, शल्‍यचिकित्‍सेतील कौशल्‍ये वापरुन मार्गदर्शन करतील. या परीषदेत बांग्‍लादेश, श्रीलंका येथूनही सहभाग मिळाला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
परीषदेच्‍या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके असून, आयोजन समिती सचिव या पदाची जबाबदरी डॉ.बाळकृष्ण पाटील आणि डॉ.अमोल देशमुख यांच्‍यावर आहे. अयोजन समितीच्‍या खजिनदार डॉ.संदीप निसाळ हे जबाबदारी सांभाळत आहेत. पुढील दोन दिवस परिषदेत वैद्यकीय परिसंवाद आणि चर्चासत्रामध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यक शास्रातील नवीनतम संशोधन, तंत्रज्ञान आणि आधुनिक व पारंपरिक आयुर्वेद याविषयी सविस्तर व्याख्याने तसेच आधुनिक शस्त्रक्रियांचे प्रशिक्षणार्थींना हस्त कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News