स्पोर्टस् आणि वुमन सायकॉलॉजीवर उपचार आता नाशिकमध्ये ; स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिकचा ५ जानेवारीला शुभारंभ

Jan 3, 2025

नाशिक– मानसिक आरोग्यांचे समाजात प्रमाण वाढते आहे. या मानसिक व्याधींवर शास्त्रोक्त समुपदेशन व उपचार सेवा प्रदान करतांना स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक रुग्णसेवेत दाखल होत आहे. ५ जानेवारीला दुपारी ४ वाजता जुनी पंडित कॉलनी येथील सिंधु सागर अकॅडमीसमोरील भास्कर अडरॉयट येथे या क्लिनिकचा शुभारंभ होणार आहे. स्पोट्‌स सायकॉलॉजी आणि वुमन सायकॉलॉजी या विषयांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या डॉ.देविका पाटील या रुग्णांचे मार्गदर्शन, समुपदेशन व उपचार करणार आहेत.
स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिकच्या शुभारंभाप्रसंगी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.बी. एस. व्ही. प्रसाद, तसेच प्रसिद्ध अस्थिविकार तज्ज्ञ आणि स्पोर्टस् ऍण्ड एक्सरसाईज विषयातील तज्ज्ञ डॉ.मिलिंद पिंप्रिकर यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
डॉ.देविका पाटील यांनी वैद्यकीय पदवी शिक्षण घेतल्यानंतर मानसशास्त्र शाखेतून पदव्युत्तर पदवी (एमडी) शिक्षण मुंबईतील नायर हॉस्पिटलमधून केले. यानंतर स्पोर्टस् सायकॉलॉजी या विशेष विषयातून युनायटेड किंगडम येथून पदव्युत्तर पदवी (एमडी) शिक्षण घेतले. त्या स्वतः उत्कृष्ट क्रीडापटू असून जर्मनी, कजाकिस्तान व गोवा अशा तीन ठिकाणी त्यांनी आयर्नमॅन ही अत्यंत खडतर समजली जाणारी स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यामुळे त्या उद्योन्मुख खेळाडूंना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी अमुलाग्र मार्गदर्शन करणार आहेत.
स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिकच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.देविका पाटील आणि नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. शरद पाटील यांनी केले आहे.

खेळाडू, महिलांना योग्य दिशा दाखविणारः डॉ.देविका पाटील
डॉ.देविका पाटील म्हणाल्या, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आलेल्या प्रत्येक रुग्णाला यथोचित मार्गदर्शन करणार आहे. काहींना समुपदेशन तर काहींना औषधोपचारातून व्याधीमुक्त करण्यावर भर राहिल. तसेच खेळाडू व महिला यांना मार्गदर्शन करत योग्य दिशा दाखविण्यावर अधिक भर राहिल. सध्या इतर विविध क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्येही प्रचंड स्पर्धा वाढली आहे. अशात खेळाडूंना शारिरीक सुदृढ राहाण्यासोबत मानसिकदृष्या स्थिर राहाणे अत्यंत महत्त्वाचे असते. बर्याच वेळा खेळातील खराब प्रदर्शन पुढील कामगिरी प्रभावित करु शकते. अशा वेळी मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य अवगत असलेले खेळाडू प्रभावी कामगिरी करु शकतात. या पार्श्वभुमीवर खेळाडूंना मार्गदर्शन केले जाईल. तसेच महिला वर्गाच्या मानसिक समस्या वेगळ्या स्वरुपाच्या असतात. एक महिला डॉक्टराकडे त्या मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतात. यातून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुलभ होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा बजावतांना खेळाडू व महिला या दोन घटकांकडे विशेष लक्ष राहाणार असल्याचे डॉ.देविका पाटील यांनी सांगितले आहे.

 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News