किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त विशेष जनजागृती

Mar 14, 2025

नाशिक – जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून, किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिकतर्फे किडनी विकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व किडनी आजाराने ग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमात डॉ. मोहन पटेल, वरिष्ठ किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण तज्ञ तथा किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथील विभागप्रमुख यांनी उपस्थितांना किडनी आजारांचे वेळीच निदान, जीवनशैलीतील सुधारणा आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत सखोल माहिती दिली.

तसेच आहार तज्ञ पिया हळदंकर यांनी किडनी आजार असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहाराविषयी मार्गदर्शन केले. डॉ. निलेश सिंग, सीओओ, किम्स मानवता हॉस्पिटल यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध अत्याधुनिक किडनी उपचार सुविधा आणि किडनी रुग्णांसाठी सवलतीच्या उपचार योजनांविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचा सांस्कृतिक विभागही विशेष आकर्षण ठरला जिथे गायक सचिन बेडीस यांनी सुंदर गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली, तर अभिनेते प्रकाश भगवत यांच्या धमाल विनोदांनी वातावरण हलकंफुलकं केलं.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंगेश दळवी, गेब्रियल स्वामी, विश्वानंद साळवे , अपूर्वा गिरडकर आणि प्रतीक कठाळे यांनी विशेष मेहनत घेतली.

अजून बातम्या वाचा..

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
Breaking News