अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे अत्याधुनिक IVUS कॅथ लॅबचे उद्घाटन – हृदयाच्या अचूक उपचारांसाठी नवे युग

Jun 14, 2025

Nashik : हृदयरोगाच्या उपचारांमध्ये नवे पर्व सुरू करत, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे आज प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेली IVUS (इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड) कॅथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही लॅब हृदयातील रक्तवाहिन्यांचे प्रत्यक्ष आणि उच्च दर्जाचे चित्र देणारे तंत्रज्ञान वापरते, जे विशेषतः गुंतागुंतीच्या आणि उच्च-धोका असलेल्या प्रकरणांत अचूक निदान आणि उपचार सुनिश्चित करते.

IVUS च्या मदतीने आता कार्डिओलॉजिस्टना रक्तवाहिन्यांच्या आतल्या भागाचे थेट दृश्य मिळते, ज्यामुळे प्लाक किती आहे, रक्तवाहिनीचा आकार किती आहे आणि अडथळ्यांची रचना कशी आहे हे स्पष्टपणे समजते. त्यामुळे स्टेंट अचूक जागी बसवता येतो, गुंतागुंती कमी होतात आणि उपचारांचे दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले होतात. या सुविधेमुळे मेडिकव्हर नाशिक हे प्रगत कार्डिओलॉजी तंत्रज्ञानाने सज्ज असलेले शहरातील अग्रगण्य केंद्र ठरले आहे.

या संदर्भात मेडिकव्हर ग्रुपचे कार्डिओलॉजी क्लिनिकल डायरेक्टर डॉ. शरथ रेड्डी म्हणाले, “मेडिकव्हर नाशिकमध्ये रुग्ण-केंद्रित आणि अचूकतेवर आधारित हृदयविकार उपचारांची पुढची पातळी आम्ही साकारत आहोत. IVUS ही सुविधा रुग्णाच्या सुरक्षिततेसह जास्त यशस्वी उपचारांसाठी एक मोठी पायरी आहे.”

कार्डिओलॉजी विभागाच्या वतीने दिलेल्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले की, “IVUS मुळे अँजिओप्लास्टी आता ‘Precision Angioplasty’ बनली आहे – ज्यामध्ये अचूकता आणि परिपूर्णता यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात. गुंतागुंतीच्या केसेसमध्ये आता निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतो आणि रुग्णांना सर्वोत्तम निकाल मिळवून देता येतात.”

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागामध्ये डॉ. सुधीर सूर्यकांत शेटकर, डॉ. गिरीश विजय बच्छाव, डॉ. कांचन एम. भांबारे आणि डॉ. सीमा नक्सणे यांसारखे अनुभवी आणि निपुण तज्ञ कार्यरत आहेत. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ICU, CCU सुविधा आणि २४ तास तत्पर आपत्कालीन कार्डिओलॉजी सेवा उपलब्ध आहेत, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सामान्य ते अतिजटिल हृदयविकारांचे उपचार सक्षमपणे केले जातात.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक हे महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत सूचीबद्ध असून, पात्र रुग्णांना अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसवणे आणि इतर महत्त्वपूर्ण उपचार पूर्णतः मोफत मिळतात. त्यामुळे या प्रगत आरोग्यसेवा आता सर्व स्तरातील नागरिकांसाठी सहज उपलब्ध होत आहेत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News