नाशिक, दि.17- एसटी महामंडळाने प्रवाशांना केंद्रस्थानी मानून त्यांना बसस्थानकामार्फत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
भगूर बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार योगेश घोलप, भगूर नगरपालिकेच्या अध्यक्षा अनिता करंजकर देवळाली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, देवळाली कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया, भगूर बसस्थानकाचे विभाग नियंत्रक श्री. कुवर आदी उपस्थित होते.
श्री. रावते म्हणाले, एसटी महामंडळा मार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये प्रवाशांच्या हितासाठी अनेक अमुलाग्र बदल करण्यात येतील. त्याचप्रमाणे एसटी महामंडळातील अनुकंपाच्या भरतीऐवजी दहा लाख रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे एसटी मंडळातील कामगारांच्या महाविद्यालयीन मुलांच्या बँक खात्यात दरमहा साडेसातशे रुपये जमा करण्यात येतात. ज्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्याचप्रमाणे ज्या कामगारांची मुले शिक्षणासाठी परदेशात जातील त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च महामंडळामार्फत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शालेय विद्यार्थिनींसाठी एसटीचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिला एसटी चालक हा देशातील पहिला प्रयोग आपल्या राज्यात करण्यात येत आहे असेही श्री. रावते यांनी सांगितले.
भगूर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्री.रावते यांच्या हस्ते बसस्थानकातील कोनशिलेचे अनावरण करून बसस्थानकाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
—–
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...






