किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये “एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी” यशस्वी

Jun 18, 2025

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे किम्स मनवता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल , नाशिक येथे आज अत्याधुनिक पद्धतीने एंडोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) तंत्रज्ञानाचा वापर करून पाठीच्या कण्याशी संबंधित विकारांवर अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, स्लिप डिस्क, स्पायनल स्टेनोसिस, मज्जातंतूंचा दाब, पाठदुखी आणि कण्यातील बिघाड यांसारख्या आजारांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत या मुळे रुग्णांना जलद बरे होण्याचा हा एक नवा अनुभव आहे.

डॉ. राज नागरकर, व्यवस्थापकीय संचालक, किम्स मानवता हॉस्पिटल म्हणाले, नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या उपचार पद्धती आणण्याच्या आमच्या ध्येयाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना दर्जेदार आणि सुरक्षित उपचार या विभागात दिले जात आहेत. पुढे ते म्हणाले, नाशिकमधील आरोग्यसेवेच्या दर्जात मोठी भर घालणारा टप्पा आहे. किम्स मनवता हॉस्पिटल हे आरोग्यसेवेत अग्रगण्य असून, आम्ही स्थानिक स्तरावर जागतिक दर्जाची उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. किम्स मनवता हॉस्पिटलने पुन्हा एकदा नाशिकला आधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचे केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्प गाठला आहे.

डॉ. ईशान नेरकर, न्युरो व स्पाईन सर्जन, यांनी सांगितले की, एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमुळे रुग्णांना खूपच कमी वेदना होतात, रुग्ण लवकर चालू लागतो आणि औषधांची गरजही कमी भासते. यापूर्वी अशा अत्याधुनिक सर्जरी फक्त मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये होत होत्या. पण आता ही सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो.

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये सुरू झालेली ही आधुनिक उपचारपद्धत उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एक मोठे वैद्यकीय पाऊल आहे. पारंपरिक ओपन स्पाईन सर्जरीमध्ये मोठी चिरफाड करावी लागते, दीर्घ बेडरेस्ट आवश्यक असतो, रुग्णाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि स्क्रू-रॉड्सचा वापर करावा लागतो.

पण एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये हे सर्व त्रास टाळता येतात. ही प्रक्रिया अत्यल्प व्यत्ययाची आहे – स्क्रू व रॉड्सची गरज नाही आणि रुग्ण काही तासांतच चालू लागतो. २४ ते ४८ तासांमध्ये रुग्णाला डिस्चार्जही देता येतो. ही खरोखरच स्पाईन सर्जरीतील एक क्रांतिकारी वाटचाल आहे.”

या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर, सर्जन, व्यवस्थापन रुग्ण रुग्णांचे नातेवाईक व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News