विजन हॉस्‍पिटलच्‍या कार्डिऑलॉजी अपडेट परीषदेत तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन विविध विषयांवर साधला संवाद

Sep 15, 2025

नाशिक– विजन हॉस्‍पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरतर्फे व असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍सच्‍या सहकार्याने कार्डिऑलॉजी अपडेट २०२५ या एक दिवसीय परीषदेचे रविवारी (१४ सप्‍टेंबर) आयोजन केले होते. या परीषदेत देशभरातून आलेल्‍या तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी सहभागींना मार्गदर्शन केले. आधुनिक औषधोपचार, ॲन्‍जीओप्‍लास्‍टी, पेसमेकर यासह हृदयविकारांचे व्‍यवस्‍थापनाबाबत सविस्‍तर चर्चा यावेळी करण्यात आली.
हॉटेल रॅडिसन ब्‍ल्‍यू येथे ही परीषद पार पडली. या परीषदेमध्ये पार पडलेल्‍या विविध सत्रांमध्ये तज्‍ज्ञांनी सहभागी होतांना मार्गदर्शन केले. लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रमन पुरी म्‍हणाले, वैद्यकीय शास्‍त्रात आतापर्यंत पाश्‍चात्‍य देशांनी ठरविलेल्‍या मानांकनांवर आधारित उपचार केले जात होते. परंतु भारतीयांची जीवनशैलीपासून अनेक गोष्टी विभिन्न आहेत. यासंदर्भात गेल्‍या काही वर्षांमध्ये भरपूर संशोधन झाले आहे. या निष्कर्षांवर आधारित भारतीय मानांकनानुसार उपचार केल्‍यास रुग्‍णांमध्ये त्‍याचे सकारात्‍मक परीणाम दिसतील.

ज्‍येष्ठ हृदयविकार तज्‍ज्ञ डॉ.विनोद विजन यांनी सत्राप्रसंगी मार्गदर्शन करताना मानांकनाचे उपचारातील महत्त्व अधोरेखीत केले. सुधारित निकषांनुसार केलेल्‍या उपचाराचे चांगले परीणाम दिसून येत असल्‍याचे त्‍यांनी निदर्शनात आणून दिले. तसेच सहभागी डॉक्‍टरांचे स्‍वागत करताना परीषदेतून घडणार्या चर्चेमुळे हृदयरोग तज्‍ज्ञांना त्‍यांच्या रुग्‍णांवरील उपचारासाठी सहाय्यता होईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.
डॉ.विक्रांत विजन यांनी हायपर टेंशनच्‍या वाढत्‍या प्रमाणाबाबत भाष्य केले. आज विविध आजारांवर प्रभावी औषधोपचार उपलब्‍ध झाला आहे. केवळ लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्‍यवेळी उपचार मिळाल्‍यास रुग्‍णांच्‍या जीवाचा धोका टळू शकतो, असे त्‍यांनी नमूद केले.

परीषदेत पहिल्‍या सत्रात मुंबई येथील डॉ. निमित शाह यांनी ॲन्‍जीओप्लास्‍टीतील नवीन तंत्राविषयी माहिती दिली. तसेच रुग्‍णांसाठी कुठल्‍या प्रकारचे औषधोपचार उपयुक्‍त ठरु शकतात, याबाबत माहिती दिली. हैद्राबाद येथील डॉ. सचिन येलगुद्री, मुंबई येथील डॉ.सौरभ देशपांडे यांनी पेसमेकर या विषयावर मार्गदर्शन करताना सर्व आधुनिक घडामोडींची माहिती दिली. नाशिकचे डॉ.गिरीष काळे यांचेही सत्र घेण्यात आले. दरम्‍यान परीषदेनिमित्त गुंतागुंतीच्‍या कोरोनरी ॲन्‍जीओप्‍लास्‍टीवर आधारित कार्यशाळा शनिवारी (१३ सप्‍टेंबर) विजन हॉस्‍पिटल येथे पार पडली. या कार्यशाळेतून सहभागी डॉक्‍टरांना मार्गदर्शन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News