किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “ॲकलेशिया कार्डिया” च्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा

Sep 20, 2025

Nashik : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे आता ॲकलेशिया कार्डिया या अन्ननलिकेशी संबंधित गंभीर आजारावर आधुनिक व अत्याधुनिक POEM (Per Oral Endoscopic Myotomy) प्रोसीजर द्वारे उपचाराची सोय करण्यात आली आहे.

डॉ. तुषार संकलेचा, मेडिकल डायरेक्टर व विभाग प्रमुख पोट व यकृत तज्ञ, यांनी सांगितले की “ ॲकलेशिया कार्डिया हा आजार अन्ननलिकेच्या शेवटच्या भागातील स्नायू नीट सैल न झाल्यामुळे होतो. त्यामुळे रुग्णांना अन्न गिळताना अडथळा जाणवतो. खाल्लेले अन्न सहज पोटात जात नाही, उलट तोंडातून किंवा नाकातून परत येते. रुग्णांना वारंवार छातीत जडपणा, दुखणे, जळजळ, गॅस आणि हळूहळू वजन कमी होण्याच्या तक्रारी जाणवतात.” तसेच रुग्ण हा त्रास वर्षानोवर्ष सहन करत असतात किंवा ऍसिडिटी म्हणून दुय्यम औषध घेऊन टाळाटाळ करत असतात. या आजाराचे निदान करण्यासाठी एंडोस्कोपी, बॅरियम स्वॉलो (X-ray टेस्ट) आणि हाय-रेझोल्यूशन मॅनोमेट्री या चाचण्या उपयुक्त ठरतात.

पूर्वी या आजारावर शस्त्रक्रिया केली जात असे. परंतु आता आधुनिक POEM प्रोसीजर – Third Space Endoscopy तंत्रज्ञान यशस्वी ठरत आहे. ही पूर्णपणे सुरक्षित, एंडोस्कोपीद्वारे केली जाणारी प्रक्रिया आहे आणि यात बाह्य शस्त्रक्रियेची गरज नसते.

डॉ. संकलेचा पुढे म्हणाले “आमच्याकडे अशे बरेच रुग्ण अनेक वर्षे खाण्यापिण्याचा त्रास होत होता म्हणून तक्रार घेऊन येत होते. त्यांना POEM प्रोसीजर करून उपचार दिल्यानंतर आता ते रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, कोणत्याही त्रासाशिवाय सामान्यपणे खाऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही अत्याधुनिक प्रोसीजर आता नाशिकमध्येच किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अन्न गिळताना त्रास होत असेल, वारंवार अन्न परत येत असेल, तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.” तसेच डॉक्टर काही महत्वाच्या चाचण्या सुचवू शकतात. जेणेकरून निदान आणि उपचार करणे सोपे जाईल.

डॉ. राज नागरकर, मॅनेजिंग डायरेक्टर, किम्स मानवता हॉस्पिटल, यांनी सांगितले “किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमीच आधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. ॲकलेशिया कार्डिया सारख्या जटिल आजारावर POEM सारखी अत्याधुनिक प्रोसीजर नाशिकमध्येच उपलब्ध करून देणे हे आमच्यासाठी अभिमानाचे पाऊल आहे.या साठी मुबई पुणे या मोठ्या महागरामध्ये जाण्याची गरज भासणार नाही, आमचे उद्दिष्ट म्हणजे रुग्णांना वेळेवर, सुरक्षित आणि सर्वोत्तम उपचार देणे हा आहे.
डॉ गौरव कुलकर्णी पोट व यकृत विकार तज्ञ म्हणाले , किम्स मानवता हॉस्पिटल सतत रुग्णांना आधुनिक, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत असून, ॲकलेशिया कार्डिया सारख्या जटिल आजारावरही प्रभावी उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. या प्रसंगी पोट व यकृत विकार विभागाचे असिस्टंट डॉ. सुनील कदम, डॉ. निकिता पाटील, टेक्निशियन कल्पना जोशी, योगेश चोपडे, सिस्टर रेणुका,पेशंट कोऑर्डिनेटर यश शिंदे, मार्केटिंग प्रतिनिधी निखिल दळवी आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय...

read more
अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

नाशिक : किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिकने प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा...

read more
Breaking News