सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये एकाच दिवशी पाच अवयवांचे प्रत्यारोपण

Sep 20, 2019

*23 वर्षीय विद्यार्थ्याने दिले तीन गरजू रूग्णांना नवजीवनसह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये हदय प्रत्यारोपण व एकाच वेळेस स्वादुपिंड – मुत्रपिंड आणि  यकृत- मूत्रपिंड प्रत्यारोपण
पुणे,18 सप्टेंबर 2019 : विश्रांतवाडी येथे अपघात झालेल्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने आपले हदय,दोन मुत्रपिंड,यकृत व स्वादुपिंड दान करत तीन गरजू रूग्णांना नवजीवन दिले. या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा 15 सप्टेंबर रोजी अपघात झाला होता व मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्याच्यावर सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नगर रोड येथे उपचार सुरू होते.17 सप्टेंबर रोजी त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले.त्याच्या नातेवाईकांनी तत्काळ अवयवदानाला संमती देण्याचे महान कार्य केले.त्याचे अवयव 18 सप्टेंबरच्या पहाटे काढण्यात आलेे व हदय,एक मुत्रपिंड व स्वादुपिंड सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,डेक्कन येथे पाठविण्यात आले.त्याचे हदय तळेगाव येथील फॉरेंसिक मेडिसिन विभागाचे प्राध्यापक व तळेगाव मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख असलेल्या एका 65 वर्षीय रूग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.स्वादुपिंड आणि मुत्रपिंडाचे एकाचवेळी प्रत्यारोपण मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व मुत्रपिंड व स्वादुपिंड निकामी झालेल्या चेन्नई येथील एका 55 वर्षीय पुरूष रूग्णावर करण्यात आले. सह्याद्रि नगर रोडयेथे दुसरे मुत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण एकाच वेळेस,मुत्रपिंडाच्या गंभीर आजाराने व हेपॅटायटिस बी ने ग्रस्त असलेल्या कराड येथील एका 32 वर्षीय आयटी व्यावसायिकावर करण्यात आले.
एकाच वेळी झालेल्या अनेक प्रत्यारोपणांच्या टीममध्ये हदयप्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.मनोज दुराईराज, हदयरोग शल्यविशारद डॉ.राजेश कौशिष व डॉ.संदीप तडस,हदय भूलतज्ञ डॉ.शंतनूशास्त्री, डॉ.सुहास सोनावणे व डॉ.सौरभ बोकील,हदयरोगतज्ञ डॉ.प्रिया पलीमकर,यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.बिपिन विभूते,डॉ.दिनेश झिरपे व डॉ.शैलेश साबळे,प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ.मनिष पाठक व डॉ.मनोज राऊत,ट्रान्सप्लांट हेपॅटोलॉजिस्ट डॉ.शीतल महाजनी,यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अनिरूध्द भोसले,नेफ्रोलॉजिस्ट डॉ.मनन दोशी आणि डॉ.सचिन पाटील, असोसिएट क्लिनिशियन डॉ.अभिजीत माने,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये,प्रत्यारोपण समन्यवक राहुल तांबे,अरूण अशोकन व अमन बेले ज्यांनी अवयवदानासाठी नातेवाईकांशी संवाद साधला.
याविषयी बोलताना सह्याद्रि हॉस्पिटल्समधील हदय प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.मनोज दुराईराज म्हणाले की,आमच्या डॉक्टरांची टीम 18 सप्टेंबरच्या पहाटे सह्याद्रि नगर रोड येथे पोहोचली व हदय सकाळी 6:15 वाजता काढण्यात आले आणि सुमारे 6:30 वाजता सह्याद्रि डेक्कन युनिट येथे आणण्यात आलेे.हे हदय कोथरूड येथे राहणार्‍या फॉरेंसिक मेडिसिन प्राध्यापक एका 65 वर्षीय रूग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.या शस्त्रक्रियेला दोन तास लागले आणि नव्या शरीरात हे हदय पुन्हा धडधडू लागले.मला आनंद आहे की,वैदयकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या या प्राध्यापकांनी आमच्या प्रत्यारोपण कार्यक्रमावर विश्‍वास ठेवला.शल्यविशारद,हदयरोग तज्ञ,भूलतज्ञ अशी ही सर्वचडॉक्टरांची टीम सह्याद्रि हॉस्पिटलची होती.हे सह्याद्रि हॉस्पिटलमधील तिसरे यशस्वी हदय प्रत्यारोपण आहे.सह्याद्रि हॉस्पिटल्समधील लिव्हर अ‍ॅन्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख व यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.बिपिन विभूते म्हणाले की,सह्याद्रि हॉस्पिटल डेक्कन येथे चेन्नई येथील गेल्या 20 वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त असलेल्या एका 55 वर्षीय रूग्णावर एकाच वेळेस स्वादुपिंड व मुत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.दुसरे मुत्रपिंड व यकृताचे प्रत्यारोपण सह्याद्रि नगर रोड येथे एकाच वेळेस मुत्रपिंडाच्या गंभीर आजाराने व हेपॅटायटिस बी ने ग्रस्त असलेल्या एका 32 वर्षीय रूग्णावर करण्यात आले.डॉ.विभूते पुढे म्हणाले की,प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.सेंथीलकुमार व भूलतज्ञ डॉ.दिनेश बाबू यांनी या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये मोलाचा सहभाग दर्शविला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
सह्याद्रि हॉस्पिटल्सचे युनिट हेड डॉ.केतन आपटे म्हणाले की,पुणे हे प्रत्यारोपणाच्या बाबतीत एक प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत आहे व सह्याद्रि हॉस्पिटल्सचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.येथील जागतिक दर्जाच्या सुविधा, शल्यविशारद,भूलतज्ञ,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व कर्मचार्‍यांमुळे हे शक्य झाले आहे.प्रत्यारोपण यशस्वी होण्यामध्ये झेडटीसीसी ववाहतूक पोलिसांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. दाते आणि त्यांचे नातेवाईकयांच्या महान कार्याला आमचा सलाम.याबाबतीत आपला 23 वर्षीय तरूण जीवलग जाण्याचा धक्का बसूनही तत्काळ प्रत्यारोपणाला संमती देत नातेवाईकांनी केलेले हे महान कार्य कौतुकास्पद आहे.ते पुढे म्हणाले की,सह्याद्रि हॉस्पिटल्स येथे प्रथमच अनेक प्रत्यारोपण एकाच वेळी करण्यात आले आणि सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News