अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने दाखल केला अपोलो प्रोहेल्थ – पहिला अंदाजक्षम, सक्रिय व सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम

Sep 21, 2019

चेन्नई: अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप या भारतातील पहिल्या मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या साखळीने आज अपोलो प्रोहेल्थ प्रोग्रॅम हा अत्यंत प्रभावी, सक्रिय आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम दाखल केला आहे. अपोलो प्रोहेल्थ हा पीएचआरएचे (पर्सनलाइज्ड हेल्थ रिस्क असेसमेंट) पाठबळ असणारा, आर्टिफिशिअल इंटलिजन्सवर आधारित पहिलावहिला कार्यक्रम असणार आहे.अपोलोने केलेल्या 20 दशलक्षांहून अधिक आरोग्य तपासण्यांच्या आधारे, अपोलोमधील प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर क्षेत्रातील तज्ज्ञांनी व संशोधकांनी प्रामुख्याने हा कार्यक्रम तयार केला आहे. आरोग्याला असणारे धोके ओळखण्यासाठी व कमी करण्यासाठी आणि निरोगी व आनंदी आरोग्य जगण्यासाठी प्रोहेल्थ कार्यक्रम व्यक्तींना व व्यवसायांना कृतीयोग्य हेल्थ अॅनालिटिक्सने सक्षम करतो. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास मार्गदर्शन करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य व आनंद मिळवण्यासाठी वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शक उपलब्ध करून, हा कार्यक्रम तंत्रज्ञान व मानवी घटक यांना एकत्र आणतो.यावेळी बोलताना, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रतास सी. रेड्डी यांनी सांगितले, “आपण सर्व जण आजार झाल्यावर ते बरे करण्यावर भर देतो, आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्यावर भर देत नाही. लोकांनी आरोग्यसेवेतील केअरवर भर द्यावा, असे मला वाटते. आजारांवर उपचार करणे, हा आरोग्याकडे जाणारा एकमेव मार्ग नाही. आपण आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला आजार बरे करण्याची गरज पडणार नाही. जगासमोर एनसीडींची (नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस) लाट आली आहे. या लाटेचा धोका तरुण पिढीलाही निर्माण झाला आहे. महत्त्वाकांक्षी व आक्रमक असणाऱ्या आपल्यासारख्या अर्थव्यवस्थेत, आपली क्षमता खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी निरोगी नागरिकांची गरज आहे. लाइफस्टाइल डिसिजेस किंवा एनसीडी यांचे प्रमाण वाढत असल्यास हे कधीही साध्य करता येणार नाही. कॅन्सर, डायबिटीस, स्ट्रोक, ओबिसिटी, धूम्रपान यांचा आपल्या क्षमतेवर परिणाम होत जातो. त्यामुळे आपली उत्पादकता व आर्थिक प्रगती यावरही परिणाम होतो. आपल्या आरोग्याला आपण कसे हाताळतो, यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने टाकलेले अपोलो प्रोहेल्थ हे एक पाऊल आहे.”अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने चार दशकांपूर्वी देशात पहिले ‘पर्सनलाइद्ड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक’ दाखल केले आणि आता आरोग्यसेवेला नवे आयाम देण्यासाठी आम्ही जगातील सर्वात प्रभावी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॅनेजमेंट प्रोग्रॅम दाखल करत आहोत. एनसीडींमुळे होणारे अंदाजे 80% मृत्यू रोखता येऊ शकतात आणि अपोलो प्रोहेल्थ कार्यक्रम हे मृत्यू थोपवण्यासाठी मदत करू शकतो,” असे त्यांनी सांगितले.अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या उपाध्यक्ष प्रीता रेड्डी यांनी सांगितले, “नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस हे आरोग्यसेवेच्या बाबतीतील सर्वात मोठे आव्हान आहे. प्रतिबंधात्मक उपाय केल्यास क्रोनिक लाइफस्टाइल आजार सांभाळता येऊ शकतात, असे डब्लूएचओने म्हटले आहे. आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांचे निदान होण्यासाठी पर्सनलाइज्ड व आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम या स्वरूपातील प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अपोलो प्रोहेल्थची निर्मिती तीन तत्त्वांवर आधारित आहे – लोकांच्या जीवनात मूर्त, मोजण्यायोग्य बदल आणण्यासाठी प्रेडिक्ट, प्रिव्हेंट व ओव्हरकम. 20 दशलक्षहून अधिक आरोग्य तपासणीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे जोखीम मोजण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे. या कार्यक्रमामुळे, देशातील स्वरूपातील प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरची संकल्पना बदलून जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवनाच्या दिशेने वाटचाल करताना, एआय-एनेबल्ड पर्सनलाइज्ड हेल्थ रिस्क असेसमेंट (पीएचआरए), आरोग्य मार्गदर्शक व लाइफस्टाइलमधील बदल यामार्फत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले जाते.”यानिमित्त अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या अपोलो फाउंडेशनच्या उपाध्यक्ष उपासना केमिनेनी कोनिडेला यांनी सांगितले, “काम व वैयक्तिक आयुष्य यांची गणिते झपाट्याने बदलते आहे. लाइफस्टाइल डिजिसेजस किंवा एनसीडी (नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस) यांचे प्रमाण वाढते आहे. आपले मनुष्यबळ एनसीडींना बळी पडते आहे, प्रतिबंध करता येईल अशा मृत्यूंचा त्रास सहन करत आहे आणि स्ट्रोक, डायबिटीस, कॅन्सर, ओबिसिटी, झोप न लागणे, कार्डिआक आजार यामुळे अपंगत्वाचा सामना करत आहे. तरुण वयातच असंख्य जण या आजारांच्या विळख्यात सापडत असल्याने परिस्थिती नाजूक आणि चिंताजनक आहे. कॉर्पोरेटनी आरोग्य हा विषय नियोजनाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे आवश्यक आहे. एनसीडींच्या लाटेचा फटका केव्हाही, कोणालाही बसण्याची भीती असल्याने या समस्येवर उपाय करण्यासाठी अंदाजक्षम साधनांच्या मदतीने एनसीडींची लाट थोपवणे व त्यापासून मनुष्यबळाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आजच्या गुंतागुंतीच्या व झपाट्याने बदलत्या आरोग्यसेवा विचारात घेता, द्रष्ट्या एम्प्लॉयर्सनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल व कल्याणाबद्दल नावीन्यपूर्ण दृष्टिकोन अंगिकारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मध्यम ते दीर्घकालीन दृष्टकोनातून, क्युरेटिव्ह ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थ असा बदल केल्यास तो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल”.डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी सांगितले, “आयुष्य बहुमोल आहे. शास्त्रज्ञांनी नमूद केल्याप्रमाणे, मानवी शरीराचे अंदाजित मूल्य 6 ट्रिलिअन डॉलरपेक्षा अधिक आहे. मनुष्य निर्माण करायचे ठरवल्यास आपल्या इतकी रक्कम खर्च करावी लागेल. आपले शरीर व आरोग्य या खरेच मौल्यवान असणाऱ्या बाबींचे संरक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्रितपणे एनसीडींविरोधात युद्ध पुकारूया आणि सर्वांसाठी चांगले आरोग्य व आनंद यांची तरतूद करूया.”अपोलो प्रोहेल्थ चेन्नई व हैदराबाद येथे आज दाखल करण्यात आला आहे आणि यानंतर अन्य मेट्रोंमध्ये दाखल करण्याचे नियोजन आहे. अपोलो प्रोहेल्थ वर्षाअखेरीस संपूर्ण अपोलो इकोसंस्थेमध्ये दाखल केला जाईल व उपलब्ध केला जाईल.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News