नाशिक, दि.24- विधानसभा निवडणूक 2019 आदर्श आचारसंहिता लागु झाल्याने निवडणूक कालावधी संपेपर्यंत जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या दारु निर्मिती, वाहतूक व विक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सीमा तपासणी पथके उभारण्यात आली असुन विभागात गस्त घालण्यासाठी विशेष गस्ती पथके स्थापन करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील अवैध, बनावट मद्य, विक्री तसेच मद्य निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांना अवैध मद्य व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आल्यास त्याबाबतची माहिती किंवा तक्रार आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक यांचे टोल फ्री क्रमांक 180083333333 व व्हाटस ॲप क्रमांक 8422001133 यावर नोंदवावी.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या आचार संहिता कालावधीत अवैध मद्य विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियोजन केलेले असुन जिल्ह्यातील सर्व दारु दुकानांना सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होणाऱ्या रेकॉर्डींगचा डाटा महिनाभर संकलीत करुन ठेवण्याच्या सूचनाही दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2019 पर्यंत 840 गुन्हे नोंदविण्यात आले असुन 722 आरोपींना अटक करण्यात आलेली असुन 58 वाहने जप्त करण्यात आली असुन त्या गुन्ह्यांमध्ये अंदाजे एकुण 1 कोटी 86 लाख 32 हजार 138 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याचे डॉ.मनोहर अुचुळे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांनी कळविले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




