बेकायदेशीर ४ गावठी पिस्तोल व ८ जिवंत काडतसे बाळगणारे २ इसम जेरबंद

Sep 27, 2019

गुन्हेशाखा युनिट क.१ कारवाई

दिनांक २६/०९/२०१२ रोजी गुन्हे शाखा युनिट १कडील पो. येवाजी महाले यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, रोकडोबा वाडी, शिवाजी पुतळ्या जवळ उपनगर नाशिक येथे दोन इसम गावठी पिस्टल घेवुन विक्री साठी येणार आहेत, त्यांनी सदरची बातमी पोलीसनिरीक्षक आनंद वाघ यांना कळविली. त्यांचे मार्गदर्शना खाली सपोनि महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, पो.हवा, रविंद्र बागुल, संजय मुळक, प्रविण कोकाटे, पोना विशाल काटे, पो.कॉ. विशाल देवरे, गणेश वडजे,चालक नजीम पठाण, असे सदर ठिकाणी रवाना झाले.दुपारी १४.०० वा. बातमीतील नमुद ठिकाणी रवाना होवुन १४.३० वा सदर ठिकाणी सापळा लावला.सुमारे १६.०० वा. चेसुमारास दोन इसम पायी शिवाजी पुतळयाजवळ आले व बोलत उभे राहीले.. बातमी दाराने इशारा करताच त्यास सापळा लावुन बसलेल्या अधिकारी कर्मचारी हे त्यांचे कडे जावु लागताच घाबरून सदरइसम पळु लागले परंतु अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना जागीच पकडले, त्यांना त्यांची नावे विचारलेअसता त्यांनी १, राहुल संदिप सोनवणे वय २७ वर्षे ,रा, फ्लॅट नं, ५, स्वप्नील सोसायटी, जय भवानीरोड, फर्नाडीस वाडी, उपनगर, नाशिक व २. वतन ब्रम्हानंद वाघमारे, वय ३१, रा. फ्लॅट नं.११, माधवपार्क, बी विंग, गोसावी नगर, लोखंडे मळा, उपनगर, नाशिक रोड, नाशिक असे सांगीतले. त्यांचीअंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला डाव्या बाजुला प्रत्येकी १ गावठी पिस्टल व प्रत्येकाचे मॅगझीनमध्ये दोन-दोन जिवंत काडतुसे मिळुन आले. त्यानंतर त्यांचे कडे आणखी पिस्टल बाबत विचारपुस करता।इसम नामे राहुल संदिप सोवनणे याने सांगीतले की त्याने उमरठी मध्य प्रदेश येथुन ४ पिस्टल आणल्याचेसांगीतले. उर्वरीत दोन पिस्टल बाबत विचारपुस करता ते त्याने त्याचे घरात टेवल्याचे सांगीतल्यानेलागलीच त्याने सांगीतल्या प्रमाणे रा, फ्लॅट नं. ५. स्वप्नील सोसायटी, जय भवानी रोड, फर्नाडीस वाडी,उपनगर येथुन आणखी दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे काढुन दिली. अशा प्रकारे सदरआरोपीतांकडुन एकुण ४ गावठी पिस्टल, ८ जिवंत काडतुसे, २ मोबाईल फोन असा एकुन १ लाख ८७हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हादाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.हवा. १२९० रविंद्र बागुल हे करत आहेत.
सन २०१९ मध्ये आज पावेता गुन्हे शाखा युनिट १ कडुन१०अवैध गावठी पिस्टल / कट्टे व
१६ जिवंत काडतुसे ३ लाख ७१ हजार रु किमंतीचे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
यातील अटक आरोपी नामे राहुल संदिप सोनवणे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचे
विरूध्द दरोडयाचे २,दरोडयाची तयारी १, जबरी चोरी १, घरफोडी १०, चोरी २. महाराष्ट्र पोलीस कायदाकलम १३५ प्रमाणे २ असे एकुण१८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे वतनब्रम्हानंद वाघमारे याचे वर जबरी चारा१व घरफोडी ८ असे एकण ९ गुन्हे दाखल आहेत.’आता पावेतो नाशिक शहरात जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रांचा पुरवठा हा महाराष्ट्र – मध्यप्रदेश सिमेजवळ असणा-या गावातून होत असल्याचे पुढे आले असून तेथील पुरवठा करणा-या इसमांची माहिती मिळाली असुन मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शना खाली उमरठी गावातीलया इसमांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील साो, मा. पोलीस उप आयुक्त श्री लक्ष्मीकांत पाटील पोलीस उप आयुक्त गुन्हे , मा. सहा. पो. आयुक्त श्री.आर.आर.पाटील साो, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. आनंदा वाघ, सपोनि, महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, पुष्पा निमसे, पोउनि. बलराम पालकर, सपोउनि. पोपट कारवाळ, बाळासाहेब ददि, पोहवा. रविंद्र बागुल, वसंत पांडव, प्रविण कोकाटे, येवाजी महाले, अनिल दिघोळे, पोना/ आसिफ तांबोळी, शांताराम महाले, देशमुख, दिलीप मोढे, विशाल काठे, संतोष कोरडे पोशि. गणेश वडजे, विशाल देवरे, राहूल पालखेडे,निलेश भोईर, प्रविण चव्हाण, सचीन अजबे, खप्नील जंद्रे, मपोशि प्रतिभा पोखरकर, चालक पाहवा,पठाण, पोशि पवार यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शना नुसार केलेली आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News